राज्याच्या विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी केली आहे.  

Updated: Sep 27, 2019, 07:13 PM IST
राज्याच्या विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी  title=
संग्रहित छाया

मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला होता. दरम्यान, निवडणूक आयोगाने आज निवडणुकीची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणात अतरणाऱ्यांना आजपासून आपला उमदेवारी अर्ज भरता येणार आहे.  ४ ऑक्टोबरपर्यंत उमेदवार अर्ज भरु शकणार आहे. राज्यात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रे असून १.८ लाख ईव्हीएम त्यासाठी वापरण्यात येणार आहे.

निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी केल्याने आजपासून निवडणूक कार्यक्रमाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. त्यामुळे इच्छुकांना जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. दरम्यान, ९ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदार मतदानाचा हक्का बजावणार आहेत.

निवडणूक कार्यक्रम

२७ सप्टेंबर : निवडणुकीची अधिसूचना जारी  
४ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जासाठी मुदत
५ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जांची छाननी होणार
७ ऑक्टोबर : अर्ज मागे घेण्याची मुदत आहे
२१ ऑक्टोबर : मतदान
२४ ऑक्टोबर : मतमोजणी