एकनाथ शिंदे यांचा परत येण्यास नकार, 40 आमदार सोबत असल्याचा दावा

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांची यादी झी 24 तासच्या हाती, पाहा कोण आहेत 'ते' आमदार

Updated: Jun 21, 2022, 10:54 PM IST
एकनाथ शिंदे यांचा परत येण्यास नकार, 40 आमदार सोबत असल्याचा दावा title=

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचं निशाण फडकवल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या बरोबर 40 आमदार असल्याचा दावा केला आहे. एकनाथ शिंदे हे सध्या या आमदारांसोबत सूरतच्या एका हॉटेलमध्ये थांबले आहेत.  

सूरतच्या हॉटेलमध्ये 33 आमदार
एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार सोबत असल्याचा दावा केला असला तरी सूरतच्या मेरिडेयन हॉटेलमध्ये 33 आमदार असल्याची यादी झी 24 तासच्या हाती आली आहे.  

कोण आहेत ते आमदार?
1 महेंद्र थोरवे
2 भरत गोगावले
3 महेंद्र दळवी
4 अनिल बाबर
5 महेश शिंदे
6 शहाजी पाटील
7 शंभूराज देसाई
8 बालाजी कल्याणकर
9 ज्ञानराजे चौघुले
10 रमेश बोरणारे
11 तानाजी सावंत
12 संदिपान भुमरे
13 अब्दुल सत्तार
14 नितीन देशमुख
15 प्रकाश सुर्वे
16 किशोर पाटील
17 सुहास कांदे
18 संजय शिरसाट
19 प्रदीप जयस्वाल
20 संजय रायुलकर
21 संजय गायकवाड
22 एकनाथ शिंदे
23 विश्वनाथ भोईर
24 राजकुमार पटेल
25 शांताराम मोरे
26 श्रीनिवास वनगा
27 प्रताप सरनाईक
28 प्रकाश अबिटकर
29 चिमणराव पाटील
30 नरेंद्र बोंडेकर
31 लता सोनावणे
32 यामिनी जाधव
33 बालाजी किनीकर

शिवसेनेत परतण्यास नकार
दरम्यान, एकनाथ शिंदे यांचं बंड शमवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक यांनी सूरतमध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती आहे. उद्ध ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना परत येण्यास सांगितलं, पण एकनाथ शिंदे यांनी त्याला नकार दिला. हिंदुत्व आणि इतर अनेक विषयावरुन शिवसेनेच्या आताच्या भूमिकेवर शिंदे नाराज आहेत. 

त्यातच आज गटनेते पदावरुन हटवल्यामुळे शिंदे यांनी दूरध्वीनवरुन बोलताना उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.