डॉ. एस एस सोनवणेंचं भाकीत खरं ठरलं, सरकारी नोकऱ्यांसाठी भरती सुरु

राज्यात सरकारी नोकरभरती सुरु झाली आहे. जिल्हा परिषद, वन विभाग, तलाठीपदासाठी आणि आरोग्य विभागासाठी मोठ्या प्रमाणावर भरती सुरु झाली आहे. 

Updated: Sep 7, 2023, 09:09 PM IST
डॉ. एस एस सोनवणेंचं भाकीत खरं ठरलं, सरकारी नोकऱ्यांसाठी भरती सुरु title=

मुंबई : सरकारी नोकर (Government Jobs) भरतीबाबत गरुड झेप अकॅडमीचे संस्थापक प्रा. डॉ.एस एस सोनवणे यांनी केलेलं भाकीत खरं ठरलंय. लवकरच सरकारी नोकभरती सुरू होणार असल्याचा दावा त्यांनी झी 24 तासवर गेल्या 21 जुलैला केला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या 19 हजार 460, वन विभागाच्या 2 हजार 138, तलाठीपदाच्या 4 हजार 644,आरोग्य विभागाच्या 4 हजार 751 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालीय. लवकरच केंद्र सरकारच्या वतीने सीआरपीएफ आणि रेल्वे भरती देखील सुरू होणार असल्याचा दावा त्यांनी केलाय.