हा शिवरायांचा महाराष्ट्र, घाबरवण्याचा प्रयत्न करू नका - संजय राऊत

हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, आम्हाला येथे घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही लढू, संपून जावू आणि प्रसंगी संपवून टाकू

Updated: Nov 14, 2019, 11:45 AM IST
हा शिवरायांचा महाराष्ट्र, घाबरवण्याचा प्रयत्न करू नका  - संजय राऊत title=

मुंबई : हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, आम्हाला येथे घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही लढू, संपून जावू आणि प्रसंगी संपवून टाकू, पण आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका, हा महाराष्ट्र घाबरणाऱ्यातला नाही, असं वक्तव्य शिवसेनेचे मुखपत्र सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांनी कुणाचंही नाव न घेता ही टीका केली

संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी झाल्यानंतर त्यांनी पहिलीच पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस नेते बोलणी करण्यासाठी मातोश्रीवर येताना दिसत नाही, या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, मीडियाकडे अपूर्ण माहिती आहे. तसेच सध्या बोलणी सुरू आहे. सर्व पक्षाचे नेते नेमके कुठे आहेत, त्यांना कोणती वेळ आणि कोणतं ठिकाण जवळ आहे, त्यावरून हे ठरतं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

या पत्रकार परिषदेते संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे वक्तव्य नैतिकतेला धरुन नसल्याचं म्हटलं आहे. तसेच आम्ही मोदींचा सन्मान राखला म्हणून, जरी देवेंद्रे फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील हे पंतप्रधान मोदींनी व्यासपीठावरून वारंवार सांगितले. 

तरी देखील शिवसेनेने प्रश्न का उपस्थित केला नाही ? असा प्रश्न अमित शाह यांनी विचारला होता. त्याला संजय राऊत यांनी उत्तर दिलं. यावर ते म्हणाले, आम्ही व्यासपीठाचे पावित्र्य जपत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान राखला.