मुंबई : कॉस्मोपॉलिटंट, मॅक्झिमम सिटी मुंबईत चाळ संस्कृती आजही टिकून आहे. विशेष म्हणजे दिवाळीत आजही सर्व जण एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात. फ्लॅट संस्कृती वाढत असताना ही चाळीतली दिवाळी सर्वांना हवीहवीशी वाटते.
मुंबईत टॉवर संस्कृती वाढतेय, फ्लॅट संस्कृतीत मैत्री आणि नात्याचा गोडवा दुरावला जात आहे, असं म्हटलं जात आहे. पण आज ज्या चाळी मुंबईत आहेत, त्यात दिवाळीचा गोडवा द्वीगुणित होत आहे. अगदी दिवाळीचा फराळ बनवण्यापासून हा गोडवा सुरू होता.
कुणी एकाचा आकाशकंदील तयार केला जात नाही, तर सर्व चाळीला सर्वत्र आकाश कंदील बनवले जातात लावले जातात. दिव्यांची रोषणाई देखील तशीच केली जाते. चाळ रंगवण्यापासून रांगोळीत रंग भरण्यापर्यंत सर्व जण एकत्र येतात. या एकत्र येण्यामुळे दिवाळीचे रंग आनंदाचं गाणं, 'आली दिवाळी' गाऊ लागतात.