मुख्यमंत्री - आरोग्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केल्या 'या' मागण्या; वायुसेनेचीही मदत घेणार

 रेमडेसिवीर, ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक झाली.

Updated: Apr 23, 2021, 03:09 PM IST
मुख्यमंत्री - आरोग्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केल्या 'या' मागण्या; वायुसेनेचीही मदत घेणार title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : देशात कोरोना संसर्गाने भयावह रुप धारण केलं आहे. त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा ऑक्सिजन, औषधांअभावी तडफडून मृत्यू होत आहे. त्यापार्श्वभूमीवर रेमडेसिवीर, ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक झाली. त्यात राज्याच्या वतीने काय मागणी करण्यात आली. त्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी माहिती दिली.

राज्यात कोरोना रुग्णांचा गंभीर आकडा पाहता, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा न्याय वाटप होणे गरजेचे आहे. दुरवरच्या राज्यातून ऑक्सिजन आणावा लागतोय. त्यासाठी वायुसेनेची मदत मिळावी. ही मागणी पंतप्रधानांनी मान्य केली आहे. रिकामे टँकर वायुसेनेच्या माध्यमातून नेले जातील आणि भरलेले टँकर रेल्वे मार्गाने आणले जातील.

फूड पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये नायट्रोजनचा वापर केला जातो आणि ऑक्सिजन बाहेर सोडला जातो,  अशा इंडस्ट्रीमधून ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न करतोय.
साखर कारखान्यांमध्ये जिथे को जनरेशन आणि इथेनॉल जे प्लॅन्ट आहेत, तिथे ऑक्सीजन प्रकल्प उभे करण्याची विनंती वसंतदादा शुगर इस्टिट्यूटने केली आहे. अशी माहिती टोपे यांनी यावेळी दिली.

ऑक्सिजनचे ऑडिट करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी केली आहे.  ऑक्सिजन वाया जाणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. एकत्र येऊन एकजुटीने काम केलं पाहिजे, राजकारणाचा विषय नसावा यावर पंतप्रधानांनी जोर दिला आहे. असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.