सायरस पुनावाला यांचे नोबेल पुरस्कारासांठी नामांकन

जगभरातील १४० देशांमध्ये पुनावाला यांच्या सिरम इन्सिट्यूटनं बनवलेल्या लसींची निर्यात होते. त्यातून आजवर अब्जावधी बालकं तसेच नागरिकांचं विविध प्रकारच्या आजारांपासून संरक्षण झालय. 

Updated: Aug 6, 2018, 11:47 AM IST
सायरस पुनावाला यांचे नोबेल पुरस्कारासांठी नामांकन title=

मुंबई: विविध प्रकारचे आजार तसेच रोगंना प्रतिबंध घालणाऱ्या लसींच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या डॉ. सायरस पुनावाला यांचं यंदाच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झालं आहे. डॉ. सायरस पुनावाला हे सिरम इंस्टीट्यूट ऑफ इंडीयाचे संस्थापक आहेत. भारतीय लसीकरणाचे प्रणेते म्हणून ते जगविख्यात आहेत.

ऑनररी डॉक्ट ऑफ ह्युमन लेटर्स

अमेरिकेतील मेसेचुसेट्स विद्यापीठाच्या मेडिकल स्कूलतर्फे सायरस पुनावाला यांना नुकतेच ‘ ऑनररी डॉक्ट ऑफ ह्युमन लेटर्स’ या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यानिमित्तानं पुण्यात त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी, रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. परवेझ ग्रांट, अभिनेता संजय दत्त, उद्योजक अतुल चोरडिया आदि मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर ग्रांट यांनी पुनावाला यांचं नोबेल पारितोषकासाठी नामांकन झाल्याची माहिती दिली.

लसींची जगभरात निर्यात

जगभरातील १४० देशांमध्ये पुनावाला यांच्या सिरम इन्सिट्यूटनं बनवलेल्या लसींची निर्यात होते. त्यातून आजवर अब्जावधी बालकं तसेच नागरिकांचं विविध प्रकारच्या आजारांपासून संरक्षण झालय. नोबेल पुरस्कार मिळाल्यास पुनावाला हे देशातील पाचवे नोबेल पुरस्कारार्थी असतील.