प्रथमेश तावडे झी मीडिया वसई: लॉकडाऊनमध्ये फक्त उद्योग धंदेच नाहीत तर इतर अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. काहींनी लॉकडाऊनमध्येही लग्न उरकली तर काहींनी पुढे ढकलली. तर काही लोकांची लग्नही मोडल्याचे प्रकार समोर आले आहेत. लग्न मोडल्याचं दु:ख तर झालंच पण गर्लफ्रेंडनं दुसऱ्याशी संसार थाटला हे पाहून तरुणाचं मन दुखावलं आणि त्याने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.
वसईत एका तरूणाने ब्रेकअप झाल्याने चक्क टेकडीवरून आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. मात्र या तरुणाला मरता मरता वाचवण्यात यश आलं आहे. तरुण आपलं आयुष्य संपवण्यासाठी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी या तरुणाला यशस्वीपणे वाचवलं आहे.
नेमकं काय प्रकरण
मुंबईत राहणाऱ्या 27 वर्षीय तरुणाची वसईमध्ये कंपनी आहे. वसईतील एका मुलीवर त्याचं प्रेम जडलं. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र लॉकडाऊनमुळे लग्न लांबणीवर जात होतं. लॉकडाऊनमध्ये लग्न लांबणीवर जात असल्यानं या गर्लफ्रेंडनं अखेर दुसऱ्या मुलाशी लग्न केलं. तिने असं का केलं याची माहिती अजूनतरी समोर आली नाही.
गर्लफ्रेंडनं दुसऱ्या मुलाशी संसार थाटल्याचं दु:ख सहन झालं नाही. तरुणाने प्रेमभंग झाल्यानं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तो एका टेकडी गेला याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी 200 पायऱ्या चढून कसा वाचवला जीव
वालीव पोलिसांनी तरूणाला बोलण्यात गूंतवून त्याला वेळीच ताब्यात घेतल्याने त्याचा जीव वाचला आहे. दोन पोलिसांनी त्याला तब्बल 20 मिनिटे फोनवर बोलण्यात व्यस्त ठेवलं. दोन पोलिसांनी 200 ते 250 पायऱ्यांची टेकडी चढून वाचवलं तरुणाचे प्राण वाचवले.
आत टेकडीच्या तब्बल 200 पायऱ्या चढून जाऊन त्याला वाचवले आहे. मुंबईत राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणाची वसईत कंपनी आहे. वसईत राहणाऱ्या एका मुलीशी त्याचे प्रेमसंबंध होते. मात्र टाळेबंदीमुळे त्यांच्या लग्नाला उशीर लागत होता. दरम्यान, त्याच्या प्रेयसीने दुसरे लग्न केले.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे दोन पोलिस बालाजी गायकवाड आणि सचिन बळीद यांनी लगेच त्या ठिकाणी धाव घेतली. हा तरुण ज्या टेकडीवर होता ती टेकडी अडीच हजार फूट उंचीवर होती. बळीद आणि गायकवाड यांनी त्याला फोनवर बोलण्यात गुंगवून ठेवले आणि त्याला आत्महत्या करण्यपासून रोखले. पोलिसांना पोहोचण्यात ५ मिनिटे जरी उशीर झाला असता तरी त्याने खाली उडी मारून जीव दिला असता.