Gold Price Today: दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घट होत होती. त्यानंतर आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. ऐन लग्नसराईत सोनं वधारल्याने ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली होती. मात्र आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. जाणून घेऊया किती आहेत सोन्याचे दर.
आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. दिवाळीनंतर लग्नसराईला सुरुवात झाली आहे. त्यामुळं वधु-वरांच्या लग्नाच्या दागिने खरेदीची सुरुवात होते. त्यामुळं सोन्याच्या दरात होणारी घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 110 रुपयांची घसरण झाली असून प्रतितोळा सोनं 78,000 रुपयांवर पोहोचलं आहे.
आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात100 रुपयांची घसरण झाली असून प्रतितोळा 71,500 रुपयांवर पोहोचलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 80 रुपयांची घसरण झाली असून 58,500 रुपये प्रतिग्रॅमवर स्थिरावलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आज सोनं 0.86 टक्क्यांच्या तेजीने 2,660.73 डॉलर प्रति औंसवर पोहोचलं आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 71, 500 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 78, 000 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 58, 500 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,150 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7,800 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 850 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 57,200 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 62,400 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 46,800 रुपये
22 कॅरेट-71, 500 रुपये
24 कॅरेट- 78, 000 रुपये
18 कॅरेट- 58, 500 रुपये