मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज जनतेशी संवाद साधणार आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सकाळी ११ वाजता ते संवाद साधणार आहेत. देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्यात मुंबई आणि पुण्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. तसेच पालघर हिंचारानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले. तसेच कोणीही या प्रकरणी राजकारण करु नका, असे स्पष्ट बजावले. ही घटना अफवेतून घडली गेली आहे. याला धार्मिकतेचा आधार देऊन नका, असे स्पष्ट केले आहे. त्यानंतर आज पवार बोलणार आहेत. त्यामुळे याकडे लक्ष लागले आहे.
BreakingNews। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज जनतेशी संवाद साधणार आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सकाळी ११ वाजता ते संवाद साधणार आहेत. देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्यातच मुंबई,पुणे या शहरात वाढत आहे. यावर काय बोलणार याची उत्सुकता
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 21, 2020
दरम्यान, दुसरीकडे पालघरमधील हिंसाचारानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे अशा विविध विषयांवर शरद पवार आज काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. तसचे कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. उद्योग बंद असल्याने उद्योजकांवर कामगारांची जबाबदारी वाढत आहे, त्यामुळे पुढील काळात बेकारी आणि बेरोजगारीचे संकट वाढू शकते. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढेल असे दिसत असल्याने आपण आताच योग्य खबरदारी घ्यायला हवी, असेही त्यांनी आधी स्पष्ट केले होते. आता २० एप्रिलपासून थोडी सूट देण्यात आली आहे. त्याची अमलबजावणी कशी करता येईल, यावर ते बोलण्याची शक्यता आहे.
कोवीड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्या, मंगळवार, दिनांक २१ एप्रिल २०२० रोजी सकाळी ११ वाजता फेसबुक लाईव्हद्वारे तुमच्याशी संवाद साधणार आहे. #LetsFightCoronaTogether #COVID19 #CoronaVirus #FacebookLive #WarAgainstVirus pic.twitter.com/abnSSsVCGG
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 20, 2020
आरोग्य व स्वास्थ्य सेवकांनी बाधित रुग्णांच्या घरी विलगीकरणास सहाय्य करताना कोणते भान ठेवावे याची सार्वजनिक आरोग्य विभाग व आरोग्य शिक्षण व संपर्क विभागामार्फत प्रसृत करण्यात आलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी, असे आवाहनही पवार यांनी याआधी केले आहे. तसेच कोरोना विषाणूच्या महामारीशी सामना करण्यासाठी सुयोग्य व शास्त्रीय दृष्टिकोनातून हात स्वच्छ करण्याची पद्धती अंगिकारणे आवश्यक आहे, असेही म्हटलेले आहे. त्याचेवळी घाबरू नका. पण जागरुक राहा. स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवा, हे करा, असे आवाहनही पवार यांनी याआधी केले आहे.