Coronavirus : ऑक्सिजनची गरज लक्षात घेता मुंबई पालिकेची तिप्पट पुरवठ्याची तयारी

Coronavirus in Mumbai : कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यातच मुंबईत दाखल होत असलेल्या दोन टक्के रूग्णांनाच सध्या ऑक्सिजनची गरज (oxygen required) भासते आहे.  

Updated: Jan 6, 2022, 12:46 PM IST
Coronavirus : ऑक्सिजनची गरज लक्षात घेता मुंबई पालिकेची तिप्पट पुरवठ्याची तयारी title=

मुंबई : Coronavirus in Mumbai : कोरोनाचा धोका वाढला आहे. कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहेत. त्यातच मुंबईत दाखल होत असलेल्या दोन टक्के रूग्णांनाच सध्या ऑक्सिजनची गरज (oxygen required) भासते आहे. मात्र भविष्यात ही मागणी वाढण्याची भीती आहे त्यामुळे मनपाने तिप्पट पुरवठ्याची तयारी केली आहे. (Mumbai Municipal Corporation is preparing to triple the supply of oxygen required)

कोरोना लक्षणे असलेले आणि रूग्णालयात दाखल कोविड रूग्ण पाचव्या दिवसीच बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे रोज कोरोनामुक्त होणाऱ्याचे प्रमाणही मोठं आहे. प्रभावी लसीकरणामुळे मुंबईतली स्थिती नियंत्रणात आहे. 

दरम्यान, राज्यात लॉकडाऊनची नाही मात्र निर्बंध कडक असू शकतात, असे संकेत काल आरोग्यमंत्र्यांनी दिलेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंजुरीनंतर हे निर्बंध लागू केले जाऊ शकतात. 

मुंबई, ठाण्यात कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढतेय. पण रूग्णालयात बेड अजूनही रिकामे आहेत. मात्र धोका लक्षात घेऊन मनपाने कोविड सेंटर्स सुरू केली आहेत. मुंबई शहर आणि उपनगर अशा दोन जिल्ह्यात मिळून 51 हजार खाटांची व्यवस्था करण्यात आलीय. तर ठाणे जिल्ह्यात जवळपास 39 बेड उपलब्ध करण्यात आलेत. कोरोना रूग्णसंख्येत रोज 20 टक्के वाढ होत आहे. त्यापैकी 89 टक्के रूग्णांमध्ये कोणतीही लक्षणं नाहीत.