मुंबई : Coronavirus Cases : राज्यात कोरोनाचा धोका वाढत आहे. संक्रमण झपाट्याने वाढत आहे. राजकीय नेते, मंत्री कोरोनाने बाधित झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मुंबईतही चार पट कोरोनाची रुग्णसंख्या वाढला आहे. दरम्यान, मुंबई शहरात 300 पेक्षा जास्त इमारती सिल करण्यात आल्या आहेत. (Coronavirus : 300 buildings sealed in Mumbai)
20 टक्के पेक्षा जास्त लोक हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. दादर आणि दादर पार्क येथील भागात कंटन्मेंट झोन करण्यात आला आहे. माहिम आणि धारावी येथेही मोठ्या प्रणात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून मुंबईत 300 पेक्षा जास्त इमारती सील करण्यात आल्या आहेत.
देशभरात पुन्हा एकदा कोरोनाच्या (Coronavirus ) रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत शुक्रवारी 17 हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर आर्थिक राजधानी मुंबईतही कोरोनाबाधितांची संख्या 25 हजारांच्या पुढे गेली आहे. राज्यात मुंबई, पुणे हे जिल्हे कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित आहेत. यात डॉक्टर लोकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. 3६४ डॉक्टर पॉझिटिव्ह आले आहेत. आता तर 300 पेक्षा जास्त इमारती सिल करण्यात आल्या आहेत.
राज्यात कोरोनाची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मुंबई आणि पुणे या दोन महानगरांत मोठ्या प्रमाणत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईबद्दल बोलायचे झाले तर, शुक्रवारी येथे 20971 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, 8490 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईतही शुक्रवारी 6 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय 1395 कोरोना रुग्ण अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. मुंबईतील रुग्णालयांमध्ये 35 हजारांहून अधिक कोरोना बेड्स तयार करण्यात आले असून त्यापैकी 6532 खाटा वापरात आहेत.
मुंबईत कोरोनाची संख्या वाढत आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण चारपट वाढत आहेत. पण कोणीही घाबरुन जाऊ नये. 950 रुग्ण हे बिकेसीत दाखल आहेत. यापैकी 280 रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत. एकही रुग्ण अतिदक्षता विभागात नाही, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.( Kishori Pednekar on Mumbai Coronavirus Cases) बीकेसीत 2 हजार 500 बेड्सची उपलब्धता आहे. 1 हजार 300 बेड्स विना ऑक्सिजनचे आहेत तर 890 ऑक्सिजनचे बेड उपलब्ध आहेत. आपल्याकडे बीकेसीत एकही आयसीयूतील पेशंट्स नाही. विरोधक लोकांना उकसवत आहेत, असा आरोप यावेळी महापौर पेडणेकर यांनी केले आहे.