'सोनिया गांधींसोबतच्या बैठकीत पुढच्या ऍक्शन प्लानवर चर्चा', संजय राऊतांची माहिती

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांची बैठक घेतली. 

Updated: May 22, 2020, 08:05 PM IST
'सोनिया गांधींसोबतच्या बैठकीत पुढच्या ऍक्शन प्लानवर चर्चा', संजय राऊतांची माहिती title=

मुंबई : कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांची बैठक घेतली. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव आणि एमके स्टालिन यांच्यासह इतर अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. सोनिया गांधींबरोबर या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती संजय राऊत यांनी दिली.

सोनिया गांधींसोबतच्या बैठकीत २२ प्रमुख राजकीय पक्ष सामील झाले. पुढचा ऍक्शन प्लान काय असावा याबाबत या बैठकीत चर्चा झाली. आर्थिक पॅकेज, स्थलांतराचा प्रश्न, शेतकरी, कामगार या मुद्द्यांवरही बैठकीत चर्चा झाली. या बैठकीतल्या चर्चेतून काही मागण्यांचं पत्र काढलं जाईल, असं संजय राऊत म्हणाले. 

सोनिया गांधींसोबतच्या बैठकीत शरद पवारांनी मांडले हे मुद्दे

अर्थव्यवस्था चालण्यासाठी विमानं आणि काही ट्रेन चालल्या पाहिजेत, असं मत संजय राऊत यांनी मांडलं. ऑनलाईन मद्यविक्री हे अर्थव्यवस्था चालवण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल असेल, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. 

कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यात यश आलं आहे. लॉकडाऊन सुरू ठेवणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला इशारा योग्य होता, अशी प्रतिक्रियाही संजय राऊत यांनी दिली. भाजपने राज्यात केलेल्या महाराष्ट्र बचाव आंदोलनावरही राऊत यांनी टीका केली. आम्ही देश बचाओ म्हणलं तर चालेल का? मग भाजपशासित राज्यांमध्येही आंदोलनं होतील, अशी टीका राऊत यांनी केली. 

'सध्याच्या परिस्थितीला मोदी सरकार जबाबदार', विरोधकांच्या बैठकीत सोनिया गांधींची टीका