मुंबईकरांना निष्काळजीपणा भोवणार ! कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालवधी इतक्या दिवसांवर

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी १७६ दिवस 

Updated: Mar 15, 2021, 11:14 AM IST
मुंबईकरांना निष्काळजीपणा भोवणार ! कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालवधी इतक्या दिवसांवर  title=

मुंबई : मुंबईत कोरोनाचे (Mumbai Corona Patient) रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी शनिवारच्या तुलनेत दहा दिवसांनी कमी झालाय. रोज १०-१२ दिवसांनी कमी होणारा हा काळ संसर्गवाढीच्या दृष्टीने नवे आव्हान घेऊन येणारा असल्याने चिंतेचं वातावरण वाढतंय. मुंबईत सध्या १३ हजार ९४० सक्रिय रुग्ण (Corona Active Patient( आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी १७६ दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या ३१ चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्यात, तर २२० इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्यात. 

मुंबईमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत असतानाच शहरातली गर्दी मात्र काही ओसरत नाहीए. नेहमीप्रमाणेच भाजी घेण्यासाठी दादरचं भाजी मार्केट हे हाऊसफुल असल्याचं चित्र दिसतंय. सोशल डिस्टनसिंगचं पालन कुठेही होताना दिसत नाही. मुंबईत गेल्या 24 तासांत 1 हजार 962 रुग्णांची नोंद झालीय. 

देशभरात कोरोनाचे 26हजार 291 रुग्ण वाढलेयत. तर 17हजार 455 जण कोरोनामुक्त झालेयत. 118 जणांचा 24 तासात मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य विभागानं ही माहिती दिलीय. देशात एकूण 1कोटी 13 लाख 85 हजार 339 केसेस आहेत. तर 1 कोटी 10 लाख 7 हजार 352 जण कोरोनामुक्त झालेयत. देशात अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा आहे 2 लाख 19 हजार 262 झालाय. 

रुग्णांचं प्रमाण अधिक असणा-या जिल्ह्यांत कंटेन्मेंट झोन्सची सक्ती  (Contentment Zone) आणि मुख्यतः लसीचा अधिकचा साठा (Corona Vaccination) द्यावा असे आदेश देण्यात आलेत. जेणेकरून लसीकरण प्रक्रियेला वेग येऊन संसर्ग नियंत्रणासाठी जोमानं प्रयत्न करता येणं शक्य होणारेय. राज्यात औरंगाबाद, अकोला, नंदुरबार, नाशिक, पुणे, बुलडाणा, वर्धा, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटीचे प्रमाण 15 टक्क्यांहून अधिक आहे. 

औरंगाबादमध्ये ते 24.4 टक्के आहे. औरंगाबादेत रुग्णवाढीची अत्यंत धोकादायक स्थिती उद्भवलीय तर अकोला, नंदुरबारमध्ये 22.6 टक्के आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या अभ्यासानुसार, या महिनाअखेरपर्यंत कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या 20 हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यताय. दरम्यान, राज्यातील मृत्यूचं प्रमाण डिसेंबर महिन्यात 2.19 टक्के होते. फेब्रुवारीत ते 0.83 टक्क्यांवर आल्याचं दिलासादायक चित्र आहे.

संशोधकांचा निष्कर्ष 

वटवाघळातून माणसात कोरोना संक्रमित होण्याआधीच त्यात थोडे बदल झालेले. त्यानंतर त्यात बदल झाले. नवे आणि जास्त संसर्ग वाढवणारे विषाणू तयार झाले,असा निष्कर्ष संशोधकांनी काढलाय. लंडनमधल्या प्लोस बायोलॉजी या नियतकालिकात याबाबतचा लेख प्रसिद्ध झालाय. कोरोना काळात पहिल्या ११ महिन्यात मूळ विषाणूत फार बदल झाले नाही. पण नंतर ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये नवे स्ट्रेन आले. हे माणसासाठी अधिक घातक असल्याचं संशोधकांनी सांगितलंय.