कोरोना लॉकडाऊन : बाजारपेठा बंदनंतर नागरिकांचा मोर्चा सुपरमार्केटकडे

 आता सुपर मार्केट बाहेर लोक शिस्तीने रांगा लावत दिसत आहेत आणि दोन व्यक्तींमध्ये योग्य अंतर सोडून उभे राहताना ते दिसत आहेत.  

Updated: Apr 11, 2020, 03:05 PM IST
कोरोना लॉकडाऊन : बाजारपेठा बंदनंतर नागरिकांचा मोर्चा सुपरमार्केटकडे title=
संग्रहित छाया

मुंबई : काही ठिकाणी नागरिक आता कोरोनाला गांभीर्याने घ्यायला लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विशेषतः सुशिक्षित वर्गात हे गांभीर्य दिसून येत आहे. आता सुपर मार्केट बाहेर लोक शिस्तीने रांगा लावत दिसत आहेत आणि दोन व्यक्तींमध्ये योग्य अंतर सोडून उभे राहताना ते दिसत आहेत.  बाजारपेठा बंद झाल्यामुळे आता नागरिकांनी आपला मोर्चा हा सुपरमार्केट कडे वळविला आहे.  

कांजूर डीमार्टच्या बाहेर नागरिकांनी चक्क दीड किलोमीटरपर्यंत रांग लावली आहे. भांडुप तसेच कांजुर परिसरांमध्ये टोटल शट डाऊन असताना खरेदीसाठी नागरिक आता डी मार्ट सारख्या सुपर मार्केट कडे वाढलेले दिसत आहेत आणि पहाटे चार वाजल्यापासून या मार्ट च्या बाहेर र् नागरिकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसत आहेत 

तर मीरा भाईंदर शहरातील भाजी मार्केट आजपासून बंद ठेवण्यात आले आहे. नागरिकांची गर्दी टाळण्याआठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. ११ एप्रिल ते १४ एप्रिलपर्यंत हे भाजी मार्केट  बंद राहणार आहे. महापालिका आयुक्त चंद्रशेखर डांगे यांनी ही माहिती दिली.

सध्या कोरोनाला रोखण्यासाठी डॉक्टर , पालिका, पोलीस यांच्याप्रमाणेच इतर आणखी देखील यंत्रणा या सध्या या लढ्यात दिवसरात्र मेहनत करीत आहेत.मुंबई, ठाणे सह महाराष्ट्राच्या विविध भागात महावितरणतर्फे वीज पुरवठा केला जातो.सध्या याचे कर्मचारी दिवस रात्र कर्तव्यावर आहेत.

अनेक ठिकाणी बंद असलेल्या इमारती, हॉल या मध्ये कोरोनटाईन सेंटर तयार करण्यात आले आहेत.इथे अवघ्या काही तासात विजेची व्यवस्था करणे, नवे मीटर लावणे, मुखतः हॉस्पिटल मधील वीज खंडित होऊ नये म्हणून शर्थीचे प्रयत्न करणे आणि घरीच असलेल्या आणि अनेक विद्युत उपकरणांचा लाभ घेत असलेल्या नागरिकांना देखील अखंड विद्युत पुरवठा ठेवणे यासाठी हे सर्व कर्मचारी मेहनत घेत आहेत.