भाजप नगरसेवकाची मुजोरी; लॉकडाऊनमध्ये मित्रांसह बर्थडे पार्टी

नवी मुबंईत आतापर्यंत 32हून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. 

Updated: Apr 11, 2020, 02:51 PM IST
भाजप नगरसेवकाची मुजोरी; लॉकडाऊनमध्ये मित्रांसह बर्थडे पार्टी  title=
संग्रहित फोटो

नवी मुबंई : संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन आहे. राज्य सरकारकडून सतत घरात राहण्याचं, अत्यावश्यक गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येतंय. मात्र लोकप्रतिनिधींकडूनच लॉकडाऊन पाळण्यात येत नसल्याचं समोर आलं आहे. पनवेल येथे भाजप नगरसेवकाने लॉकडाऊनमध्ये आपल्या वाढदिवसाची पार्टी केल्याचं समोर आलं आहे. नगरसेवकाने घराच्या टेरेसवर मित्रांसोबत पार्टी करत वाढदिवस साजरा केला आहे.

नगरसेवकाकडूनच लॉकडाऊनचं उल्लंघन केल्याप्रकरणी पनवेल पोलिसांनी 11 जणांवर कारवाई केली आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या 11 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 11 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना नगरसेवकाकडून अशाप्रकारे नियमांचं उल्लंघन करण्यात आलं आहे. नवी मुबंईत आतापर्यंत 32हून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.