corona in mumbai : तर संपूर्ण इमारत सील होणार, मुंबई मनपाचं नवं धोरण

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने मुंबई मनपाने हा निर्णय घेतला आहे

Updated: Jan 3, 2022, 10:45 PM IST
corona in mumbai : तर संपूर्ण इमारत सील होणार, मुंबई मनपाचं नवं धोरण title=

मुंबई : कोरोना (Corona Virus) प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने (BMC) इमारत सील करण्यासंदर्भात नवं धोरण (New Guidlines) जाहीर केलं आहे.  एखद्या इमारतीत किंवा विंगमध्ये राहत असलेल्या एकूण रहिवाशांच्या २० टक्के  रहिवाशांना कोरोनाची बाधा झाल्यास संबंधित इमारत किंवा विंग सील केली जाणार आहे.

कोरोनाबाधित रूग्ण होम क्वारंटाईन (home quarantine) असल्यास किमान १० दिवस घरी असावं. तसंच त्याला सलग तीन दिवस ताप नसावा.

हाय रिस्क (high risk) संपर्कातील व्यक्तींना सात दिवस होम क्वारंटाईन राहावं लागेल. ते ५ व्या किंवा सातव्या दिवशी आरटीपीसीआर (RT-PCR Test) करू शकतील. जर लक्षण आढळल्यास तात्काळ आरटीपीसीआर करावी लागेल.

बिल्डींग सील केलेल्या इमारतींमधील रहिवाशांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू देण्याची जबाबदारी सोसायटीच्या कमिटीवर राहिल.

मुंबईत आजचा आकडा
मुंबईत आज ८ हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले. गेल्या चोवीस तासात मुंबईत तब्बल ८ हजार ८२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईवरील कोरोनाचं संकट अधिकच गडद होत चाललं आहे.