मुंबई : कोरोनाचा फैलाव सुरु असला तरी काही प्रमाणात कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी होत हे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.४२ टक्के इतके आहे. राज्यात ६३ हजार ३४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात गुरुवारी ३६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ७७ हजार ४५३ झाली आहे. गुरुवारी कोरोनाच्या ४८४१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
राज्यात आज 4841कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 147741 अशी झाली आहे. आज नवीन 3661 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 77453 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 63342 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) June 25, 2020
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख ४८ हजार २६ नमुन्यांपैकी १ लाख ४७ हजार ७४१ नमुने पॉझिटिव्ह (१७.४२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ५६ हजार ४२८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ९५२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. गुरुवारी १९२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी १०९ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८३ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.६९ टक्के एवढा आहे.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.४२ टक्के. आज बरे झालेल्या ३६६१ रुग्णांसह आतापर्यंत ७७ हजार ४५३ रुग्णांना डिस्चार्ज. सध्या ६३ हजार ३४२ रुग्णांवर उपचार सुरू. आज ४८४१ नवीन #COVID_19 बाधितांची नोंद- आरोग्यमंत्री @rajeshtope11
➡सविस्तर वृत्त- https://t.co/FTAsDZhn8z pic.twitter.com/ZbYtv4Fbx4
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 25, 2020
मागील ४८ तासात झालेले १०९ मृत्यू हे मुंबई मनपा-५८, ठाणे मनपा-३, नवी मुंबई मनपा-१, भिवंडी-निजामपूर मनपा-१,मीरा-भाईंदर मनपा-१,वसई-विरार मनपा-२,रायगड-१ जळगाव मनपा-१, जळगाव-४, नंदूरबार-१, पुणे-१, पुणे मनपा-१६, पिंपरी-चिंचवड मनपा-४, सातारा-१, औरंगाबाद-२, औरंगाबाद मनपा-८, अकोला-१, अकोला मनपा-१, बुलढाणा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील असून इतर राज्यातील २ मृत्यूंचा समावेश आहे.