मुंबई : डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला 100 पर्यंत आलेली कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या पाचशेपर्यंत वाढली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होऊ लागली आहे. गेल्या चोवीस तासात नवे 490 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
मुंबईत रविवारी 336, सोमवारी 204, आणि मंगळवारी 327 रुग्ण आढळले होते. त्यानंतर गेल्या चोवीस तासात यात आणखी भर पडली आहे.
दिलासादायक बाब म्हणजे आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आज 229 रुग्णांनी कोरोनावर मात कर घरी परतले. मुंबईत सध्या 2419 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
मुंबईत पॉझिटिव्हिट रेट 97 टक्के इतका आहे. तर रुग्णदुपटीचा कालावधी 1962 दिवसांवर आला आहे. कोरोनाची तिसरी लाट टाळायची असेल तर कोरोना प्रतिबंधात्मक नियम काटेकोरपणे पाळणं आवश्यक आहे.
राज्यातील रुग्णांची वाढ
राज्यातही गेल्या चोवीस तासात 1201 नविन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 953 जण कोरोनामुक्त झाले. राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 97.71 टक्के इतकं आहे.
राज्यात ओमायक्रॉनचे किती रुग्ण?
राज्यात आज ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळलेला नाही. आतापर्यंत राज्यात ओमायक्रॉनच्या 65 रुग्णांची नोंद झाली असून 35 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.