मुंबईकरांनो सावधान! वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे प्रशासन अलर्ट

 राज्यात कोरोनाचे 2946 नवे रुग्ण आढळलेत. तर मुंबईत 1803 रुग्ण सापडलेत. राज्यात काल दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.तर सध्या राज्यात कोरोनाचे 16 हजार 370 रुग्ण सक्रिय आहेत. 

Updated: Jun 13, 2022, 08:41 AM IST
मुंबईकरांनो सावधान! वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे प्रशासन अलर्ट  title=

मुंबई : राज्यात कोरोनाचे 2946 नवे रुग्ण आढळलेत. तर मुंबईत 1803 रुग्ण सापडलेत. राज्यात काल दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.तर सध्या राज्यात कोरोनाचे 16 हजार 370 रुग्ण सक्रिय आहेत. तर मुंबईमध्ये 10 हजारांपेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा मुंबईसह राज्यातला कोरोनाचा आकडा सातत्यानं वाढतोय.  

 राज्यात आणि मुंबईत रुग्णसंख्या वाढ... 

  • महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णसंख्येत वाढ
  • गेल्या 24 तासात देशात 8582 रुग्णांची वाढ
  • गेल्या 24 तासात 4435 रुग्ण कोरोनामुक्त
  • देशभरात एकूण 44 हजार 513 रुग्णांवर उपचार सुरू

कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय, काळजी घ्या

राज्यात प्रौढ लोकसंख्यपैकी जवळपास 8 टक्के म्हणजेच तब्बल 70 लाख नागरिक कोरोना लसीच्या पहिल्या डोसपासून वंचित आहेत. जवळपास 1 कोटींहून अधिक लसींचा सध्या राखीव साठा आहे. त्यामुळे लवकरात लवकर नागरिकांनी लस घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्यावतीनं केलं जातंय.