राज्यात थंडी वाढणार, काही ठिकाणी पावसाची शक्यता

थंडीची चाहूल लागली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीत वाढ होण्याची शक्यता असून राज्यात काही ठिकाणी पाऊस पडेल.  

Updated: Dec 14, 2018, 11:49 PM IST
राज्यात थंडी वाढणार, काही ठिकाणी पावसाची शक्यता title=

मुंबई : राज्यात थंडीची चाहूल तीन दिवासांपासून चांगलीच लागली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीत वाढ होण्याची शक्यता असून राज्यात काही ठिकाणी पाऊस पडेल. तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीत वाढ होण्याची शक्यता असून राज्यात काही ठिकाणी पाऊस पडेल. तर  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा कमी झालाय. त्यामुळे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याचे संकेत आहेत, अशी माहिती हवामान विभागाने दिलेय.

राज्यात १६ आणि १७ डिसेंबरला ढगाळ हवामान राहील. तर पूर्व-विदर्भात पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण होण्याचे संकेत आहेत. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्व-विदर्भात अर्थात पूर्व-अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.   

तसेच गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि पूर्व-यवतमाळ जिल्ह्यांतील काही भागात पावसाची शक्यता असल्याचे मत हवामान विभागाने व्यक्त केलेय. या हवामानाच्या स्थितीमुळे पूर्व-विदर्भात धुकं राहील आणि कमाल तापमानात घट होईल. राज्यातील इतर भागात१५ ते १७ डिसेंबर रोजी काही प्रमाणात आभाळ भरुन येईल. पूर्व-विदर्भातील शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे, असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.