मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किमती जरी कमी होत असल्या तरी आता सीएनजीच्या किमतीही वाढल्या आहेत. यामुळे सामान्यांना काही दिलासा मिळालेला नाही. मुंबईत सीएनजीचे दर प्रति किलोमागे १ रुपये ९५ पैसे एवढे वाढले आहेत. यामुळे आता मुंबईत सीएनजीसाठी प्रति किलो ४६ रुपये १७ पैसे मोजावे लागणार आहेत. तर मुंबईबाहेर सीएनजीचे दर अधिकच वाढले आहेत.
सीएनजीच्या वाढत्या किमतींमुळे भाडेवाढ करण्यात यावी अशी मागणी टॅक्सी आणि रिक्शा चालकांनं केली आहे. तर पेट्रोल-डिझेल सलग अकराव्या दिवशी स्वस्त झालं आहे. पेट्रोलचे दर ४० पैसे आणि डिझेलचे दर ३२ पैशांनी कमी झालं आहे. गेल्या अकरा दिवसांमध्ये सुमारे २ रुपयांनी दर कमी झाले आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा घट झाली आहे. सलग ११व्या दिवशी इंधन दरात घट झाली आहे. शनिवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा एकदा घट झाल्याचं पहायला मिळालं. पेट्रोलच्या दरात ४० पैशांनी घट झाली आहे तर, डिझेलच्या दरात ३० पैशांनी घट झाली आहे.