'त्याला जितकं वाचवता येईल तितकं वाचवा...' मुख्यमंत्री शिंदे यांच्या ओसडींना जीवे मारण्याची धमकी

मुख्यमंत्र्यांच्या ओसडींना नक्षलवाद्यांचं लाल शाईने लिहिलं धमकीचं पत्र

Updated: Nov 1, 2022, 03:06 PM IST
'त्याला जितकं वाचवता येईल तितकं वाचवा...'  मुख्यमंत्री शिंदे यांच्या ओसडींना जीवे मारण्याची धमकी title=

Naxalite Letter : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) यांचे विशेष कार्य अधिकारी OSD डॅाक्टर राहुल गेठे (Rahul Gethe) यांना नळलवाद्यांची जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. डॅाक्टर राहुल गेठे यांना त्यांच्या घरी नक्षलवाद्यांनी लाल शाईने लिहिलेले धमकीचे पत्र मिळालं आहे. पत्रात नक्षलवाद्यांनी डॅाक्टर राहुल गेठे यांना जीवे मारण्याती धमकी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली पाच वर्षे डॅाक्टर राहुल गेठे विशेष कार्य अधिकारी OSD म्हणून कार्यरत आहेत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister) असताना त्यांनी नक्षलग्रस्त भागात (Naxalite Area) अनेक विकासांची कामे सुरू केली होती. या विकास कामांची अंमलबजावणी करून ती वेगात पुर्ण करण्याची जबाबदारी विशेष कार्य अंधिकारी म्हणून डॅाक्टर राहुल गेठे यांच्यावर होती. त्यावेळी नक्षलवाद्यांनी डॅाक्टर राहूल गेठे यांना त्यांच्या कामात अडथळा निर्माण करत विकास कामे सुरू न करण्यासाठी धमक्या दिल्या होत्या.

आता मुख्यमंत्री झाल्यावरही एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामे वेगाने करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार डॅाक्टर राहूल गेठे यांनी अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी डॅाक्टर राहूल गेठे यांना टारगेट करत जीवे मारण्याची धमकीचं पत्र त्यांच्या घरी पाठवलंय. 

नक्षलवाद्यांनी लिहिलेल्या पत्रात काय?
जय लाल सलाम जय किसान 'डॅाक्टर राहुल गेठे को आखरी चेतावणी…' एकनाथ शिंदे का ॲाफिसर डॅाक्टर राहुल गेठे बहुत उड रहा है. हमारा नुकसान गडचिरोली मे बहुत कर रहा है. हम हमारे भाईयोंका बदला जलद ही लेने वाले है. उसकी मौत का एलान निकल चुका है. महाराष्ट्र सरकार को उसकी जबाबदारी जितना लेना हे ले लो