Urfi Javed : उर्फी जावेदला तात्काळ पोलिस संरक्षण द्या; चित्रा वाघ यांच्याकडून हल्ला होण्याची भीती

उर्फीला सुरक्षा पुरवण्याबाबत तात्काळ कारवाई करा असं पत्रच आयोगाने मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवले आहे.  महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हे पत्र लिहिले आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत असुरक्षित वाटणे ही गंभीर बाब असल्याचेही रुपाली चाकणकर यांनी या पत्रात नमुद केले आहे. 

Updated: Jan 17, 2023, 04:04 PM IST
Urfi Javed : उर्फी जावेदला तात्काळ पोलिस संरक्षण द्या; चित्रा वाघ यांच्याकडून हल्ला होण्याची भीती  title=

Chitra Wagh Vs Urfi Javed: राज्य महिला आयोग मॉडेल उर्फी जावेदच्या (Urfi Javed) पाठीशी उभा राहिला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्याकडून हल्ला होण्याची भीती उर्फी जावेदने व्यक्त केली आहे. यानंतर उर्फीला सुरक्षा पुरवण्याबाबत आयोगाकडून मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवण्यात आले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar, President of the Commission for Women) यांनी हा पत्रव्यवहार केला आहे. 

उर्फीला सुरक्षा पुरवण्याबाबत तात्काळ कारवाई करा असं पत्रच आयोगाने मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवले आहे.  महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हे पत्र लिहिले आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत असुरक्षित वाटणे ही गंभीर बाब असल्याचेही रुपाली चाकणकर यांनी या पत्रात नमुद केले आहे. 

सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी  जावेद विरोधात  पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्तांनी उर्फी जावेदच्या चौकशीचे आदेश दिले होते. अधेरी येथील अंबोली पोलीसांनी तिची चौकशी केली. उर्फी नंतर आता चित्रा वाघ यांना चौकशीचा सामोरं जाव लागण्याची शक्यता आहे (Chitra Wagh Vs Urfi Javed). 

दरम्यान, चित्रा वाघ त्यांच्या कार्यकर्त्यांसह आपल्यावर हल्ला करु शकतात, तेव्हा  चित्रा वाघ यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी उर्फी जावेदनं महिला आयोगाकडे केली आहे. उर्फी जावेदनं शुक्रवारी राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात जात चित्रा वाघ यांच्या चौकशीची विनंती केली. ट्टिटरच्या माध्यमांतून धमक्या देण्यासारखे प्रकार घडत असल्याचेही तिने महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.  उर्फीच्या तक्रारीची दखल घेत महिला आयोगाने उर्फीला सुरक्षा पुरवावी अशी मागणी केली आहे. 

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलीस ऊर्फीची चौकशी करणार आहेत. तर, उर्फीच्या तक्रारीबाबत महिला आयोगाने पोलिसांना पुढील कारवाईच्या सूचना दिल्या असल्याचे समजते. त्यानुसार, आता उर्फीला धमकावल्याप्रकरणी महिला आयोगाच्या सूचनेनुसार पोलीस चित्रा वाघ यांचीही चौकशी करण्याची शक्यता आहे. चित्रा वाघ धमकवतायत, असा आरोप उर्फीने केला होता. तर, मी धमकी दिली नाही, इशारा दिला, असं चित्रा वाघ यांनी म्हटंल आहे.