ठाणे हार्बर एसी लोकलकडे प्रवाशांची पाठ

पनवेल ठाणे हार्बर एसी लोकलचा फज्जा...

Updated: Feb 4, 2020, 07:42 AM IST
ठाणे हार्बर एसी लोकलकडे प्रवाशांची पाठ title=

मुंबई : मोठ्या थाटामाटात पनवेल ठाणे हार्बर एसी लोकल सुरू करण्यात आली. पण त्याचा फज्जा उडाल्याचं चित्र आहे. या एसी गाडीतून हाताच्या बोटांवर मोजता येतील, इतके प्रवासीच प्रवास करतायत. प्रवाशांनी या लोकलकडे पाठ फिरवल्याचंच चित्र आहे. पहिल्या दिवशी २५० लोकांनी या लोकलमधून प्रवास केला होता. पण तिसऱ्या दिवशी ही संख्या जेमतेम १० वर आली आहे. तर गारेगार प्रवासाकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे.  

मध्य रेल्वे विभागात अनेक वर्षापासून एसी लोकल धावेल अशा फक्त चर्चाच रंगत होत्या. मात्र, अखेर मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर पहिली एसी लोकल धावली आणि प्रवासांनी गारेगाव प्रवास अनुभवला. पहिल्याच दिवशी फुलांनी सजवलेली एसी लोकल प्लॅटफॉर्मवर आली. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी पनवेल-ठाणे लोकलला हिरवा झेंडा दाखवत या लोकलची सुरुवात केली.

सध्या एक रेक आली आहे अजून रेक आल्यावर सुविधा वाढवण्यात येईल. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून मग ही रेल्वे सेवा वाढवण्यात येईल, असं मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांनी म्हटलं होत. पण आता प्रवाशांचा प्रतिसात पाहात एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार की नाही यावर प्रश्न उपस्थित होत आहे.