मध्य रेल्वेद्वारे गेल्या १५ दिवसांत जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक
कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढतेय
Updated: Apr 11, 2020, 12:31 PM IST
मुंबई : कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वे आवश्यक वस्तू वाहून नेण्यासाठी फक्त मालवाहतूक चालवित आहे. २४ x ७ सतत कार्यरत असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणांतील मालवाहतूक धक्के (गुड्स शेड), स्थानके आणि नियंत्रण कार्यालयांमधील रेल्वे कर्मचा-यांनी देशभरात पुरवठ्यासाठी ७४४ रॅक्समध्ये आवश्यक वस्तूंच्या ३७,७७८५ वॅगन लोड करणे शक्य केले आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे अशा विविध ठिकाणी २३.३.२०२० ते ७.४.२०२० पर्यंत या वॅगन्स लोड केल्या गेल्या. अत्यंत वरिष्ठ स्तरावर अधिका-यांमार्फत मालवाहतूकीवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. मध्य रेल्वेला या कठीण काळात आपली महत्त्वपूर्ण भूमिकेची जाणीव आहे आणि या प्रयत्नात पूर्णपणे सहकार्य करण्याची सर्व भागधारकांना विनंती आहे.
रेल्वे वाहतूक सेवा बंद असली तरीही मालवाहतूक सुरू आहे. या मालवाहतूकीमार्फत ही सेवा पुरवली आहे. लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा बंद आहे. १४ एप्रिलला मोदींनी घोषित केलेल्या लॉकडाऊनचा कालावधी संपणार आहे. यावर आज चर्चा होणार असून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.