Central Railway News : (Indian Railway) भारतीय रेल्वे विभागाकडून प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत सातत्यानं काही महत्त्वाच्या सुविधा आखल्या जातात आणि त्याची अंमलबजावणी केली जाते. रेल्वेच्या अशाच एका सुविधेला प्रवाशांनी इतकी कमाल पसंती दिली आहे, की याचा थेट नफा रेल्वेच्या कमाईमध्ये दिसू लागला आहे. आता तुम्ही म्हणाल रेल्वेची ही सुविधा नेमकी कोणती आणि त्याचा पर्यटकांशी नेमका काय संबंध? तर, रेल्वेच्या या सुविधेमुळं लांब पल्ल्याचा प्रवास आणखी सुखकर झाला असून, प्रवाशांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळं येत्या काळात मध्य रेल्वेकडून या सुविधेमध्ये आणखीही काही स्वागतार्ह बदल केले जाऊ शकतात.
देशातील पर्यटनाला केंद्रस्थानी ठेवत काही निवडक रेल्वे गाड्यांना काचेच्या खिडक्या आणि छत देण्याची अनोखी योजना रेल्वेला चांगली फळली. संपूर्ण seat वळवता येत असल्यामुळं रेल्वे प्रवासादरम्यान, ही धडधडणारी ट्रेन जेव्हा डोंगरदऱ्यांतून, नदीवरून, समुद्रावरून, खाडीवरून जाते तेव्हा नजर जाईल तिथवर बाहेरचं हे दृश्य साठवण्याची संधी मिळतेय ती म्हणजे रेल्वेच्या विस्टाडोन डब्यांमुळं. (Central Railway passangers prefers vistadome coach helps to collect whooping amount latest news )
जाणून आश्चर्य वाटेल, पण मागील 10 महिन्यांमध्ये रेल्वेच्या या अगदी खास विस्टाडोम कोचनं 1.47 लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. मुख्य म्हणजे पर्यटनाला केंद्रस्थानी ठेवत राबवण्यात आलेली ही संकल्पना आता रेल्वेच्या तिजोरीत भर टाकताना दिसत आहे. अधिकृत माहितीनुसार विस्टाडोम ट्रेनमुळं रेल्वेच्या कमाईत 21.95 कोटी रुपयांची भर पडली आहे.
2018 मध्ये पहिल्यांदाच मुंबई- मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये विस्टाडोम कोच /डबा जोडण्यात आला होता. प्रवाशांनी या विस्टाडोम कोचला दिलेला प्रतिसाद पाहता याच मार्गावर आणखी एका ट्रेनला म्हणजेच तेजस एक्स्प्रेसलाही हा डबा जोडण्यात आला. यामागमोमाग मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेस या रेल्वेलाही विस्टाडोम कोचची साथ मिळाली.
मुंबईतून निघणाऱ्या अनेक रेल्वे कोकण पट्ट्यामधून पुढे जातात. या मार्गावर अनेक डोंगररांगा, नद्या आणि निसर्गसौंदर्याची लयलूट झाल्याचं पाहायला मिळतं. प्रवाशांना रेल्वे प्रवासादरम्यान याच सौंदर्याचा अनुभव घेता यावा यासाठी सुरुवातीला रेल्वेकडून प्रायोगिक तत्त्वावर विस्टाडोम कोच जोडण्यात आले होते. सर्वसामान्य रेल्वे डब्यांना असणाऱ्या खिडक्यांपेक्षा विस्टाडोम कोचच्या खिडक्या मोठ्या असतात त्यामुळं प्रवास करताना येणारी धमालही दुपटीनं वाढते.
आश्चर्याची बाब म्हणजे प्रत्येत ट्रेनला एक विस्टाडोम कोच असून, तो 90 टक्के आरक्षितच असतो. काही रेल्वे गाड्यांमधील विस्टाडोम कोचमध्ये प्रवाशांची संख्या 99 टक्क्यांहून जास्त असते. (Mumbai Pune Mumbai Deccan Express) मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेसमध्ये 99.50 टक्के, (Madgan CSMT Janshatabdi Express) मडगांव- सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये 97.13 टक्के, (Mumbai Karmali Mumbai Tejas Express) मुंबई-करमाळी-मुंबई तेजस एक्स्प्रेसमध्ये 91.05 टक्के तिकीटं सरासरीनं आरक्षित केली जातात. थोडक्यात रेल्वे प्रवासादरम्यान काही प्रवासी अर्थानं Luxury लाही पसंती देतात असं म्हणणं योग्यच ठरेल. तुम्ही कधी केलाय या विस्टाडोम कोचनं प्रवास?