अटल सेतूवरून शिवनेरी बस धावणार, मुंबई- पुणे प्रवासासाठी 'इतकं' असणार तिकीट

Mumbai-Pune Shivneri Bus : मुंबई-पुणे या मार्गावरुन एसटीची शिवनेरी बस धावणार आहे. एसटी महामंडळाच्या निर्णयामुळे प्रवासाचा तुमचा किती वेळ वाचणार आहे? तसेच तिकीटाचे दर किती असणार आहे? जाणून घ्या सविस्तर बातमी...

श्वेता चव्हाण | Updated: Feb 19, 2024, 11:41 AM IST
अटल सेतूवरून शिवनेरी बस धावणार, मुंबई- पुणे प्रवासासाठी 'इतकं' असणार तिकीट  title=

Mumbai-Pune Shivneri Bus Service Via Atal Setu in Marathi : मुंबई-पुणे या मार्गावरील एसटीचा प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. कारण या मार्गावरुन एसटी महामंडळाने शिवनेरी बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शिवडी न्हावा-शेवा अटल पुलावरून मुंबई ते पुणे मार्गावर शिवनेरी बसेस प्रायोगिक तत्त्वावर धावणार आहे. 

शिवडी ते नाव्हाशेवा दरम्यान बांधण्यात आलेल्या नव्या अटल सेतूवरून एसटीची शिवनेरी बस सुरू करण्यात आली असून प्रायोगिक तत्त्वावर उद्या दिनांक 20 फेब्रुवारीपासून पुणे स्टेशन ते मंत्रालय या मार्गावरुन सकाळी 6.30 वाजता एक फेरी असेल तर  स्वारगेट ते दादर सकाळी ७ वाजता या दोन मार्गावर शिवनेरी बस सुरू करण्यात येत आहेत. या बसेस पुणे येथून निघून थेट पनवेल नाव्हाशेवा, शिवडी मार्गे मंत्रालय/दादर येथे पोहोचतील.  त्यानंतर परतीचा प्रवास सकाळी 11 व दुपारी 1 वाजता याचमार्गे मंत्रालय व दादर येथून निघतील.

यामुळे गर्दीच्या वेळी प्रवासाचा सुमारे 1 तास वाचणार आहे. तसेच एसटी महामंडळाने तिकट संदर्भात प्रवाशांना दिलासा दिला असून मुंबई-पुणे या मार्गावरील तिकीट दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. तरी प्रवाशांनी या बस फेऱ्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. या बस फेऱ्या अर्थात, एसटीच्या अधिकृत msrtc mobile reservation ॲप वर व www.msrtc.gov.in संकेतस्थळावर  आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. 

तसेच शिवनेरी बस मुंबईतून सुटताना त्यामधून 45 प्रवाशांची संख्या असणारा आहे. तसेच अटल सेतूमुळे मुंबई-पुणे प्रवासाचा वेळेत देखील बचत होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात शिवनेरी बस स्थानक ते मुंबई-पुणे अशी एक फेरी अटल पुलावरून चालवण्याचे नियोजन सुरू आहे. दादर-शिवडी-अटल सेतू-उलवे-पनवेल-पुणे असा या शिवनेरी बसचा मार्ग असणार आहे.  

मुंबई-पुणे प्रवासांचा किती वेळ वाचणर? 

शिवडी न्हावा-शेवा अटल सेतू सेवेत दाखल झाल्यापासून एसटीची मुंबई-पुणे शिवनेरी बस या मार्गावरुन सुरुवात करा,अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. याचपार्श्वभूमीवर आता मुंबईहून अवघ्या 20 मिनिटांत चिर्ले गाठणे शक्य होणार आहे ते ही विना सिग्नल. चिर्लेहुन हे मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर 60 किमी अंतरावर आहे. वाशी, कळंबोली मार्गाच्या तुलनेत अटल ब्रिजमार्गे पुणे ते दादर हे अंतर पाच किलोमीटरने कमी भरते. याव्यतिरिक्त, वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता, शिवनेरी बसने अटल सेतूला जाण्याचा खर्च कमी केला जाऊ शकतो. मात्र, तुम्ही मुंबईहून अटल ब्रिजमध्ये प्रवेश केल्यास, तुम्हाला मुंबई-पुणे दरम्यानचे पनवेल एसटी स्थानक वगळावे लागेल. पनवेलसह इतर लहान-मोठ्या बसेस तुम्ही नेऊ शकणार नाहीत.