Mumbai Local CR Mega Block On Sunday: मध्य रेल्वेच्या मेन लाइनबरोबरच, हार्बरवरील वाहतूक व्यवस्थेत Mega Block मुळे मोठा बदल

Central Railway Mega Block On Sunday: मध्य रेल्वेनं मेगब्लॉकची घोषणा केली असून तांत्रिक काम आणि देखभालीच्या कामासाठी हार्बर मार्गावरील सेवेवरही परिणाम होणार आहे.

Updated: Feb 17, 2023, 06:56 PM IST
Mumbai Local CR Mega Block On Sunday: मध्य रेल्वेच्या मेन लाइनबरोबरच, हार्बरवरील वाहतूक व्यवस्थेत Mega Block मुळे मोठा बदल title=
mumbai local mega block

Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वेने (Central Railway) रविवारी म्हणजेच 19 फेब्रुवारी 2023 रोजी मेगाब्लॉकची घोषणा केली आहे. रेल्वेच्या मेन्टेन्सचं काम असल्याने हा ब्लॉक घेतला जाणार असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या मेगाब्लॉकदरम्यान कोणत्या स्थानकांदरम्यान कशापद्धतीने वाहतूक बंद असेल यासंदर्भातील सविस्तर माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. जाणून घेऊयात या रविवारच्या मेगाब्लॉकचं संपूर्ण शेड्यूल...

> विद्याविहार - ठाणे 5 वी आणि 6 वी लाईन सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 3.30 पर्यंत प्रभावित होणार आहे.

> ब्लॉक कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या डाउन आणि अप मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि विद्याविहारदरम्यान डाउन आणि अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि वेळेपेक्षा 10 ते 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.

> छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी (सायन)/वांद्रे हार्बर लाईन सकाळी 11.40 वाजल्यापासून सायंकाळी 4.40 पर्यंत रेल्वे सेवा प्रभावित होणार आहे. तसेच चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 वाजल्यापासून सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत वाहतूक मेगाब्लॉकच्या वेळापत्रकाप्रमाणे चालणार आहे.

> छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सकाळी 11.16 वाजल्यापासून सायंकाळी 4.47 वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 वाजल्यापासून ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगावकरीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

> पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
 
> ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
 
> हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी असेल.