कर्जतहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली

कर्जतहून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत.

Updated: Dec 29, 2017, 08:36 AM IST
कर्जतहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली  title=

मुंबई : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे. कर्जतहून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत.

एक फुटाचा तुकडा 

७ वाजून ८ मिनिटाच्या दरम्यान कर्जतहून मुंबईच्या दिशने येणारी रेल्वे थांबविण्यात आली. रेल्वे ट्रॅकचा एक फुटाचा तुकडा कापल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामूळे ही घातपाताची शक्यता असल्याचे अनुमान लावले जात आहेत. 

रिक्षा चालकांकडून लूट ?

 संपूर्ण लोकल खाली करण्यात आली आहे. प्रवासी मिळेल त्या वाहनाने कामाच्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान अशा प्रसंगात रिक्षा चालकांकडून लूट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.