मुंबईत पबला भीषण आग, मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

कमला मिल कंपाऊंडमध्ये मोजोस पबला आग लागल्यानंतर होरपळून १५ जणांचा मृत्यू तर २० जण जखमी झालेत. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पब मालकाविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Updated: Dec 29, 2017, 08:34 AM IST
मुंबईत पबला भीषण आग, मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल title=

मुंबई : कमला मिल कंपाऊंडमध्ये मोजोस पबला आग लागल्यानंतर होरपळून १५ जणांचा मृत्यू तर २० जण जखमी झालेत. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पब मालकाविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मोजोस टेरेस पबमध्ये शॉर्ट सर्किट?

दरम्यान, आगीतील जखमींपैकी ६ जण केईएम रुग्णालयात, भाटीया रुग्णालयात दोन तर ऐरोली येथे एकाला दाखल करण्यात आलेय. मुंबईतील लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या भीषण आगीत १५ जणांचा मृत्यू तर २० जण जखमी झालेत. इमारतीच्या गच्चीवर असलेल्या मोजोस टेरेस पबमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

पार्टी सुरु असताना लागली आग

या परिसरात बरीच कॉर्पोरेट ऑफिसेस, रेस्टॉरंट आणि पब आहेत. टेरेसवर असलेल्या पबमध्ये पार्टी सुरू असताना ही आग लागल्याची माहिती समोर येतेय. आग इतकी भीषण होती की टेरेसवर बांधण्यात आलेलं बांबू आणि प्लास्टिकचं संपूर्ण छप्पर जळून खाक झालं. 

आगीचे लोट कमला मिल कंपाऊंडच्या बाहेरून स्पष्ट दिसत होते. रात्री साडेबाराच्या सुमारास ही लागली होती साडेतीन तासाच्या अथक परिश्रमानंतर हि आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना यश आलं. जखमींवर मुंबईच्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.