मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर बोरघाटात बस उलटली

बस ३०-४० फूट सुरक्षा कठडा तोडून खोल दरीत पडली. 

Updated: Oct 5, 2018, 08:43 AM IST
मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर बोरघाटात बस उलटली title=

मुंबई : मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर बोरघाटात बस उलटली मात्र सुदैवानं सर्व प्रवासी सुखरुप आहेत. मुंबईहून पुण्याकडे जाणा-या मार्गावर शिग्रोबा मंदिराजवळ हा अपघात घडलाय. बस पुण्याकडून मुंबईकडे चुकीच्या दिशेने प्रवेशबंदीमधून खोपोलीला उतरत होती. बस ३०-४० फूट सुरक्षा कठडा तोडून खोल दरीत पडली.

झाडामध्ये बस अडकली 

 झाडामध्ये बस अडकली आणि प्रवाशांचा जीव वाचला. हे सर्व प्रवासी खोपोलीतील व्यापारी आहेत. १० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरूय. खोपोली पोलीस आणि शिवदुर्ग टीम, अपघातग्रस्तांच्या मदतीला टीमच्या सदस्यांनी तत्काळ मदतकार्य राबवून प्रवाशांना सुखरुप बाहेर काढलं.