मुंबई : अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनवरुन भाजप आणि शिवसेनेत पुन्हा वादाची ठिणगी पडलेय. आधी सेनेने फटकारल्याने आता भाजपने बोचरी टीका केलेय. भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी जोरदार टीका केलेय.
आशिष शेलार यांनी शिवसेनेचे नाव न घेता जोरदार हल्लाबोल चढवलाय. जे मुंबईत रस्ते, नाल्यांच्या कामांचा दर्जा सांभाळू शकत नाहीत, नव्या कल्पनांचे खड्डे ज्यांच्याकडे आहेत अशांनी उगाच बुलेट ट्रेनची काळजी करू नये, अशा शब्दात फटकारलेय.
जे मुंबईत रस्ते,नाल्यांच्या कामांचा दर्जा सांभाळू शकत नाही.नव्या कल्पनांचे "खड्डे" ज्यांच्याकडे.. त्यांनी उगाच बुलेट ट्रेन ची काळजी करू नये!
— ashish shelar (@ShelarAshish) September 16, 2017
त्याचवेळी मराठा आरक्षणाची काळजी करु नये, असे सांगत भाजप सरकार कायद्याच्या चौकटीत मराठा आरक्षण टिकावे म्हणून काम करत आहेत, असे ट्विट करुन टीकाकारांना सुनावलेय.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि ते कायद्याच्या चौकटीत टिकावे म्हणून भाजप सरकारचे काम सुरु आहे. मंत्रिमंडळ उपसमिती हा त्यांतील एक पाऊल. (1)
— ashish shelar (@ShelarAshish) September 16, 2017