भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) नेते चमकुरा मल्ला रेड्डी यांनी पुढील पाच वर्षात तेलुगू चित्रपटसृष्टी हॉलिवूड आणि बॉलिवूडवर राज्य करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. इतकंच नाही तर त्यांनी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला तू लवकरच हैदराबादला स्थलांतर करशील असंही सांगितलं. 'अॅनिमल' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हैदराबादमध्ये निर्मात्यांनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात चमकुरा मल्ला रेड्डी यांनी हे विधान केलं.
चार वेळा ऐकलं तरी समजलं नाही, तुम्हाला कळतंय का पाहा; Aniaml मधील डायलॉगवरुन रश्मिका तुफान ट्रोल
'अॅनिमल' चित्रपटाच्या निर्मात्यांकडून हैदराबादमध्ये प्रमोशनसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात चित्रपटात मुख्य भूमिकेत असणारे रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदाना उपस्थित होते. याशिवाय दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू आणि दिग्दर्शक राजामौली यांनीही हजेरी लावली.
बीआरएस नेते चमकुरा मल्ला रेड्डी यावेळी म्हणाले की, "रणबीर कपूर तू ऐक...पुढील 5 वर्षात तेलुगू लोक हॉलिवूड आणि बॉलिवूडवर राज्य करतील. तूदेखील लवकरच हैदराबादला शिफ्ट होशील. याचं कारण मुंबई आता जुनी झाली आहे. बंगळुरुत नुसती वाहतूक कोंडी होत असते. आता फक्त हैदराबाद भारतावर राज्य करणार".
I’m a HUGE fan of Ranbir Kapoor & he is the BEST Actor in India - Superstar #MaheshBabu pic.twitter.com/pkGsAC46G5
— RK (@seeuatthemovie) November 27, 2023
"राजामौली, राजू हे फार हुशाल लोक आहेत. आता संदीप रे्डीही आला आहे. आमचं हैदराबाद सर्वात वरती आहे. तेलुगू लोक फार हुशार आहेत. आमची हिरोईन रश्मिका पाहा किती हुशार आहे. आमच्या 'पुष्पा' चित्रपटाने खळबळ माजवली होती. तुमचा अॅनिमल चित्रपटही 500 कोटींची कमाई करेल," असं चमकुरा मल्ला रेड्डी म्हणाले.
You were the first Superstar #MaheshBabu I ever met, I remember messaging him after watching Okkadu and he replied, and I cant thank you enough for Supporting sir, Jai Babu Jai Babu - Ranbir Kapoor#AnimalPreReleaseEvent pic.twitter.com/DB6UQHCvDp
— RK (@seeuatthemovie) November 27, 2023
अॅनिमल चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ट्रेलरवरुन हा चित्रपट मुलगा आणि बापाच्या नात्यावर भाष्य करत असल्याचं दिसत आहे. वडिलांना आपला अभिमान वाटावा यासाठी कोणत्याही पातळीला जाऊ शकणारा मुलगा यात दाखवण्यात आला आहे. अनिल कपूरने बापाची तर रणबीर कपूरने मुलाची भूमिका निभावली आहे. रश्मिका रणबीरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर बॉबी देओल प्रमुख व्हिलन आहे, ज्याच्या मागावर रणबीर कपूर आहे.
Two heartthrobs of their respective industries #RanbirKapoor #MaheshBabu#AnimalPreReleaseEvent pic.twitter.com/3oMfsr0Nv0
संदीप रेड्डीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 'कबीर सिंग'नंतर हा त्याचा दुसरा चित्रपट आहे. 1 डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे. विकी कौशलच्या 'सॅम बहादूर'ला चित्रपट आव्हान देईल. याआधी चित्रपट ऑगस्टमध्ये रिलीज होणार होता. पण 'गदर', 'ओएमजी 2' आणि 'जेलर'मुळे तारीख पुढे ढकलण्यात आली होती.