Breast Cancer Treatment : कॅन्सर म्हटलं की सर्वांच्या मनात आधीच धडकी भरते. अनेकांना तर आपलं मरणंच डोळ्यासमोर दिसतं. या भीतची फायदा अनेक डॉक्टर, रुग्णालये घेतात. असाच प्रकार एका महिलेसोबत घडला आहे. तिच्यावर डॉक्टरांनी इतके भयानक उपचार केले की यामुळे ती आज या जगात नाही. चीनमध्ये हा प्रकार समोर आला. येथे कॅन्सरच्या उपचाराच्या नावाखाली एका महिलेला लुटण्यात आले. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
चीनी उपचारामुळे एक महिला निराधार झाली तसेच तिला जीवही गमवावा लागला. तुम्हाला वाटेल की कोणत्या तरी साध्या डॉक्टरकडे तिने उपचार घेतले असतील. पण तिला उपचार देणारी व्यक्त अशिक्षित नव्हती तर एक कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट होती. कॅन्सरच्या उपचारावर संशोधन करणे हे या संस्थेचे काम होते. कॅन्सर इन्स्टिट्यूटने असा प्रयोग केला ज्यात महिलेला आपला जीव गमवावा लागला.
चीनच्या स्वयंघोषित कॅन्सर ट्यूमर रिसर्च इन्स्टिट्यूटने कॅन्सर उपचाराच्या नावाखाली वांग महिलेची फसवणूक केली आहे. या संस्थेत ही महिला तिच्या आईवर उपचार करत होती. 2021 मध्ये आईला शेवटच्या टप्प्यातील स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते.
त्यानंतर ही महिला चीनमधील वुहानमध्ये एका कॅन्सर तज्ज्ञाला भेट झाली. आमच्याकडे एक औषध आहे जे कर्करोगाच्या पेशी नष्ट करू शकते, असा दावा त्यांनी केला. तसेच या औषधाला अनेक सरकारी संस्थांकडून पुरस्कार मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या औषधाचे पेटंटही त्यांनी दाखवले. यावर त्या महिलेने विश्वास ठेवला आणि आपल्या आईला संस्थेत दाखल केले.
आईच्या उपचाराच्या नावाखाली महिलेला 23 लाख रुपयांची औषधे खरेदी करायला सांगण्यात आली. आईचा जीव वाचावा या हेतून ती महिला औषधे घेऊन आली. वुहानला मैल प्रवास करून आईवर उपचार घेत असे. महिलेला गोळ्या देण्याबरोबरच डॉक्टरांनी उपचारही केले जे तिच्या आईसाठी जीवघेणे ठरले.
डॉक्टरांनी महिलेच्या स्तनात डझनभर इंजेक्शन्स दिली. त्यानंतर डॉक्टरांनी जे केलं ते भयानक होतं. महिलेच्या स्तनांवर सिमेंट आणि चुना लावण्यास सांगितले. यामुळे रुग्ण महिलेच्या त्वचेवर फोड आले आणि त्वचा जळली. महिलेच्या संपूर्ण शरीरात कर्करोग पसरला. हे सर्व नॉर्मल असल्याचे डॉक्टर म्हणत राहिले पण महिलेचा मृत्यू झाला.
स्थानिक प्रशासनाने या चिनी डॉक्टरवर गुन्हा दाखल केला. आपल्याकडे कोणतीही पदवी नसून, तो केवळ बनावट उपचार करत असल्याची कबुली त्याने दिली. त्यांची वैद्यकीय संस्थाही बनावट आहे. त्यांनी सर्व पुरस्कार ऑनलाइन खरेदी केले होते. चीनच्या या बनावट डॉक्टरमुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला.