समीर वानखेडे यांची हायकोर्टात धाव, हायकोर्टाकडून दिलासा

हायकोर्टात नेमकं काय घडलं? समीर वानखेडे यांना हायकोर्टाकडून तूर्तास दिलासा

Updated: Oct 28, 2021, 03:39 PM IST
समीर वानखेडे यांची हायकोर्टात धाव, हायकोर्टाकडून दिलासा title=
मुंबई: ड्रग्स प्रकरणाचा तपास करणाऱ्या समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर हे प्रकरण गंभीर झालं. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या बर्थ सर्टिफिकेटवरून आता वाद टोकाला गेला आहे. समीर वानखेडे यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.  'चौकशी करायचीच असेल तर CBI किंवा NIAनं करावी' अशी मागणी आता समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयाकडे केली होती. हायकोर्टाने समीर वानखेडे यांना दिलासा दिला आहे. 
 
कोणतीही तूर्तास कठोर कारवाई करण्यास हायकोर्टानं राज्य सरकारला मनाई केली आहे. आलेल्या तक्रारीमध्ये तथ्य आढळून वानखेडे यांच्या विरोधात अटकेची कारवाई करायची असेल तर त्यांना त्याची 3 दिवस आधी नोटीस देणं राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांना बंधनकारक असणार आहे. असे कोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत.
 
नेमकं काय प्रकरण? 
समीर वानखेडे यांच्या विरोधातील तक्रारीची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी 4 अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. प्रभाकर साईल, ऍड. सुधा द्विवेदी, ऍड. कनिष्का जैन आणि नितीन देशमुख यांनी समीर वानखेडे यांच्या विरोधात वेगवेगळ्या तक्रारी आहेत. समीर वानखेडे यांची चौकशी 4 अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे. 
 
सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले, पोलीस निरीक्षक अजय सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत कारकर आणि पोलीस उप निरीक्षक प्रकाश गवळी या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती. वानखेडेंच्या चौकशीसाठी राज्याकडून SITची स्थापन करण्यात आली आहे. मात्र वानखेडे यांनी CBI किंवा NIAनं चौकशी करण्याची मागणी केली आहे. 
 
NCB ला तपासासाठी हवी ती मदत करण्यासाठी तयार असल्याची भूमिका नवाब मलिक यांनी घेतली आहे. एनसीबीने आपल्याकडे या प्रकरणात काही माहिती मागितली तर करणार असल्याचं सांगितलं आहे. आता समीर वानखेडे यांना हायकोर्टानं दिलासा दिला आहे. सध्या कोणतीही कारवाई होणार नसल्याची माहिती मिळाली आहे.