मुंबई : Mumbai Drugs Case :राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते (NCP) नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे Zonal Director समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिकाच सुरु केली आहे. काल पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांनी मुंबई ड्रग्स पार्टीत एका दाढीवाल्याचा उल्लेख केला होता. दाढीवाला असणारा हा मोठा आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया असून तो समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा मित्र असल्याचा आरोप मलिकांनी केला होता. (Nawab Malik on Mumbai Drugs Case - Who International Drug Mafia ?)
काशिफ खान असं या दाढीवाल्या व्यक्तीचं नाव आहे. तो फॅशन टीव्हीचा MD असल्याची माहिती समोर आली आहे...काशिफची प्रेयसीही या पार्टीत होती. काशिफ खानला अटक का केली नाही असाही सवाल मलिकांनी उपस्थित केला आहे.
काशिफ खान मोकाट आहे आणि काही लोकांना प्रसिद्धीसाठी विनाकारण अडकवण्यात आलं आहे,' असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. ही पार्टी केवळ काही लोकांना टार्गेट करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. एक आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया आपल्य प्रेयसीसोबत पार्टीत सहभागी झाला होता. पण एनसीबीनं त्याला अटक केली नाही. कारण तो समीर वानखेडे यांचा मित्र आहे, तो तिहार आणि राजस्थानच्या तुरुंगात होता असा दावा नवाब मलिक यांनी केला होता.
समीर वानखेडे चौकशी प्रकरणी NCBला हवी ती मदत करण्यास तयार असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. NCBनं याप्रकरणी आपल्याकडे काही माहिती आणि मदत मागीतल्यास आपण ती देण्यास तयार असल्याचं मलिक यांनी सांगितलं. दरम्यान या व्डिडिओ बाबतची झी २४ तास पुष्ठी करत नाही.