शिवसेनेत येण्याबाबत उर्मिला मातोंडकरांचा मोठा खुलासा....

त्यांनी मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती

Updated: Dec 2, 2020, 07:06 PM IST
शिवसेनेत येण्याबाबत उर्मिला मातोंडकरांचा मोठा खुलासा....  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : मागील काही दिवसांपासून अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या शिवसेनेत येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. किंबहुना खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना फोनवरुन आमदारकीचा प्रस्ताव दिला असून त्यांनी हा प्रस्ताव त्यांनी स्वीकारल्याची माहितीही सुत्रांनी दिली होती. त्यामुळं उर्मिला यांना शिवसेनेची आमदारकी मिळणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला. 

आता खुद्द उर्मिला यांनीच या चर्चांबाबत मोठा खुलासा केला आहे. शिवसेनेशी जोडलं जाण्याच्या या चर्चांना त्यांनी कोणत्याही प्रकारचा दुजोरा दिलेला नाही. शिवसेनेत येण्याबाबतचा प्रश्न विचारला असता मी या पक्षाशी जोडली जात नाही, असं म्हणत त्यांनी ही बाब स्पष्ट केली. 

 

उर्मिला मातोंडकर यांनी सुशांतसिंह राजपूत प्रकरणात कंगना राणौतला जोरदार प्रत्युत्तर दिल्यानंतर त्या पुन्हा चर्चेत आल्या होत्या. त्यांनी मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. मातोंडकर यांना भाजपच्या गोपाल शेट्टी यांनी हरवलं होतं. मात्र सहा महिन्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी ६ महिन्यानंतर काँग्रेसमधून अंतर्गत गटबाजीच्या कारणावरुन राजीनामा दिला होता.