BMC Job: मुंबई पालिकेत बंपर भरती; परीक्षेची गरज नाही, नोकरी मिळाली तर 76 हजारपर्यंत पगार

BMC Recruitment: पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात ही भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत तुम्हाला नोकरी मिळाली तर 76 हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 14, 2023, 09:35 AM IST
BMC Job: मुंबई पालिकेत बंपर भरती; परीक्षेची गरज नाही, नोकरी मिळाली तर 76 हजारपर्यंत पगार title=

BMC Job: चांगल्या पगाराची नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई पालिके अंतर्गत येणाऱ्या आस्थापनांमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणती परीक्षा होणार नसून थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात ही भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत तुम्हाला नोकरी मिळाली तर 76 हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. त्यामुळे नोकरीसाठी लागणी पात्रता, अर्जाची शेवटची तारीख याची सविस्तर माहिती घेऊया. 

मुंबई पालिकेच्या केईएम रुग्णालयाअंतर्गत सिनीअर रेसिडेंशियल म्हणजेच वरिष्ठ निवासी आणि हाऊस ऑफिसर म्हणजेच गृह अधिकारी ही पदे भरली जाणार आहेत. 

रिक्त पदांचा तपशील आणि मुलाखतीची पहिली फेरी

सिनीअर रेसिडेंशियची एकूण 149 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून एमडी/डीएन/डीएनबी/एमसीएच पर्यंतचे शिक्षण घेणे आवश्यक आहे. मुलाखतीच्या माध्यमातून ही निवड होणार असून वरिष्ठ अधिकारी पदासाठी सोमवार, 17 जुलै रोजी थेट मुलाखत होणार आहे. इच्छुक उमेदवारांना सकाळी 10.30 वाजता उपस्थित राहावे लागणार आहे.

दुसरीकडे होम ऑफिसरची एकूण 117 पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी बीएएमएस किंवा एमबीबीएस असणे आवश्यक आहे. हाऊस ऑफिसर पदासाठी मंगळवार, 18 जुलै रोजी थेट मुलाखत होणार आहे.  इच्छुक उमेदवारांना सकाळी 10.30 वाजता उपस्थित राहावे लागणार आहे. 

मुलाखतीची दुसरी फेरी

वरिष्ठ निवासी आणि गृह अधिकारी या दोन्ही पदांची दुसरी फेरी 28 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजल्यानंतर होणार आहे. 

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 38 आणि कमाल 43 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

मुलाखतीचा पत्ता

मुंबई पालिकेअंतर्गत येणारी महाविद्यालये, मुंबईतील सरकारी महाविद्यालये, महाराष्ट्रातील इतर सरकारी महाविद्यालये, महाराष्ट्राबाहेरी पण भारतातील यूजीसी मान्यताप्राप्त महाविद्यालयातून शिक्षण घेतेलेल्या उमेदवारांना नोकरीत प्राधान्य दिले जाणार आहे.

उमेदवारांना मुलाखतीसाठी तिसरा मजला, सीव्हीटीसी इमारत,सेठ जीएसएमसी आणि केईएम रुग्णालय, परळ, मुंबई - 400012 येथे उपस्थित राहावे लागणार आहे. 

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा