मुंबई : मुंबईतल्या हॉटेल आणि मॉल इमारतींच्या छतावरील हॉटेल्सला मंजुरी देण्यात आलीय. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिलीय.
केवळ व्यावसायिक इमारतींवरच्या छतावरच हॉटेल्स सुरू करता येणार आहेत. मात्र, यासाठी आजूबाजूला १० मीटर अंतरावर रहिवासी इमारत नसणं बंधनकारक असणार आहे. तसंच मॉल आणि लॉजिंग भागातल्या छतावरील हॉटेल्सना परवानगी देण्यात आलीय.
युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या कल्पनेतला महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. आता या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यामुळं शिवसेनेला मोठा दिलासा मिळालाय.
Commercial Establishment/building मध्ये Rooftop restaurants साठी BMC कडून परवानगी मिळाली आहे. सर्व संभाव्य सुरक्षा उपायां सकट मंजूरी.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 1, 2017
यामुळे मुंबईला नक्किच फायदा होईल तसेच पर्यटन, रोजगार आणि राज्याचा महसूल वाढण्यास मदत होईल. मला आनंद आहे की BMC ने याची सुरुवात केली.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 1, 2017
या प्रक्रियेत सहभागी झालेल्या प्रत्येकास मी धन्यवाद देतो, महापालिका आयुक्तांनाही धन्यवाद.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 1, 2017
हा मसुदा प्रशासनाने नव्याने तयार केला आहे, नेत्यांसोबत संपर्क साधला(पूर्वी ट्विट केले होते)आता rooftop restaurant साठी दिशानिर्देश तयार आहेत
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 1, 2017