भाजप नेते किरीट सोमय्या यांचं ठाकरे सरकारला 'ओपन चॅलेंज'

संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर INS विक्रांत घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर आता सोमय्या यांचा पलटवार

Updated: Apr 7, 2022, 11:07 AM IST
भाजप नेते किरीट सोमय्या यांचं ठाकरे सरकारला 'ओपन चॅलेंज' title=

मुंबई : संजय राऊत यांनी काल INS विक्रांत घोटाळा घोषित केला. पण आश्चर्याची बाब अशी आहे  अजूनपर्यंत या घोटाळ्यासंदर्भातील एक कागदही संजय राऊत (Sanjay Raut) देऊ शकलेले नाहीत. ठाकरे सरकारचे पोलीस म्हणतात, एफआयआर दाखल झाला आहे, पण मला एफआयआरची कॉपी देत नाहीत असं भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी म्हटलं आहे. 

आम्ही एक दमडीचा घोटाळा केलेला नाही. आणि म्हणून माझं पुन्हा एकदा चॅलेंज आहे उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांना की आम्ही 58 कोटी गोळा केले, कुठे मनी लॉन्ड्रींग केलं, ती माहिती जनतेसमोर ठेवावी. आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीला तयार आहोत, आम्ही कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. 
  
ठाकरे सरकारचे घोटाळे काढतोय आणि काढत राहाणार, आज जरंडेश्ववरच्या शेतकऱ्यांसोबत ईडी कार्यालयात जाणार आहे. जरंडेश्वर साखर कारखाना बेनामी पद्धतीने अजित पवार (Ajit Pawar) यांनी ताब्यात घेतला आहे. तो त्यांनी परत करावा, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. 

किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय. निवृत्त युद्धनौका आयएनएस विक्रांतच्या डागडुजीसाठी किरीट सोमय्यांनी लोकांकडून निधी गोळा केला. मात्र हा निधी राजभवनात जमा केला नाही अशी तक्रार फिर्यादी बबन भोसले यांनी दाखल केली होती. त्याची दखल घेत किरीट सोमय्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.  किरीट सोमय्या यांच्यासह त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय.