मुंबई : Maharashtra Political Crisis Latest Updates: राज्याच्या राजकारणार काल मोठी घडामोडी घडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आज भाजपच्या कोअर टीमची महत्वाची बैठक (BJP holds core committee meeting) होत आहे. महाराष्ट्र प्रभारी सी.टी रवी मुंबईत येण्याची शक्यता आहे.
या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप नेते उपस्थित राहणार आहेत. भाजप आजच सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. तर उद्याच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे शपथ घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपने मोठा जल्लोष साजरा केला.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख नेते उद्धव ठाकरे यांनी आज 30 जून होणाऱ्या फ्लोअर टेस्टच्या आधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. पण ठाकरे पायउतार झाल्यावर महाराष्ट्राचे राजकीय चित्र बदलले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. राज्यपालांनी राजीनामा स्वीकारला आणि पर्यायी व्यवस्था होईपर्यंत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावर राहण्यास सांगितले. आज भाजपच्या कोअर कमिटीत सत्तास्थापनेचा दावा करण्याबाबत चर्चा होणार असली तरी संभाव्या मंत्रिमंडळात कोण असेल याची चाचपणी होण्याची शक्यता आहे.