मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतने Sushant Singh Rajput काम केलेल्या शेवटच्या चित्रपटातील कलाकारांची आता चौकशी होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहार पोलिसांकडून या कलाकारांना चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. यावेळी सर्व कलाकारांचे जबाब नोंदवून घेतले जाऊ शकतात. सध्या बिहार पोलिसांचे एक पथक सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आले आहे. त्यामुळे सध्या प्रकरण चांगलेच चर्चेत असून दररोज नव्या घडामोडी सुरु आहेत.
'याच पोलिसांसोबत ५ वर्ष काम केलंत'; सुशांतसिंग प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांचं भाजपला प्रत्युत्तर
मात्र, बिहार पोलिसांकडून कलाकारांची स्वतंत्रपणे चौकशी झाल्यास महाविकासआघाडी सरकार काय भूमिका घेणार, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरेल. 'दिल बेचारा' हा सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट ठरला होता. सुशांतच्या आत्महत्येनंतर ४० दिवसांनी म्हणजे २४ जुलैला ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'दिल बेचारा' प्रदर्शित झाला होता. ट्रेलरपासूनच सुशांतच्या चाहत्यांनी या चित्रपटाला उचलून धरले होते.
Bihar Police to record statements of the actors who worked with #SushanSinghRajput till his last movie: Bihar Police Sources
A team of Bihar Police is in Mumbai to probe the actor's death.
— ANI (@ANI) August 1, 2020
सुशांतसिंग प्रकरणावरून मुंबई-बिहार पोलीस आमने-सामने, मुंबईच्या रस्त्यावर हाय व्होल्टेज ड्रामा
दरम्यान, बिहार पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाल्यापासून हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. या सगळ्यामुळे मुंबई आणि बिहार पोलीस आमनेसामने आले आहेत. कालच मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांच्या पथकातील अधिकाऱ्यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई केली होती. यावरुन बराच वादंग निर्माण झाला होता. तत्पूर्वी या प्रकरणावरुन महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारणही रंगले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलिसांऐवजी केंद्रीय यंत्रणांकडून तपास करण्याची गरज व्यक्त केली होती.