महत्त्वाची बातमी; मुंबई महापालिका निवडणुकांआधी आरक्षणासंदर्भातील मोठी घडामोड

महापालिकेची निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहे.   

Updated: May 30, 2022, 08:05 AM IST
महत्त्वाची बातमी; मुंबई महापालिका निवडणुकांआधी आरक्षणासंदर्भातील मोठी घडामोड  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : (big news ) गेल्या बऱ्याच दिवसांपासून राज्याच्या आणि मुख्य म्हणजे मुंबई शहराच्या राजकीय पटलावर ज्याची चर्चा सुरु होती, त्या महानगरपालिका निवडणुकांसंदर्भातील अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ही माहिती आहे निवडुकांतील आरक्षणासंदर्भातली. (mumbai bmc election )

रंगशारदा सभागृहामध्ये मंगळवारी पालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत निघणार आहे. यंदा महापालिकेची निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहे. 

परिणामी सध्या सर्व पक्षांचे उमेदवार गॅसवर असल्याचं पाहायला मिळत आहे. आता कोणत्या गटाला निवडणुकीत नेमकं किती आरक्षण मिळतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

दरम्यान, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक होऊ देणार नाही असे सांगत विरोधी पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्यास विरोध केला होता. तर राज्य सरकारनेही ओबीसी आरक्षण लागू होत नाही तोपर्यत निवडणूका घेणार नाही अशी भूमिका घेतली होती.

काय आहे प्रभाग विभागणी? 
अनुसूचित जातींसाठी 15 प्रभाग 
अनुसूचित जाती महिलांसाठी 8 प्रभाग 
अनुसूचित जमातींसाठी 2 प्रभाग 
अनुसूचित जमात महिलांसाठी 1 प्रभाग 
खुल्या वर्गासाठी 219 प्रभाग