Milk Prices : (Ganeshotsav 2022) गणेशोत्सवाच्या निमित्तानं सध्या सर्वत्र लगबग सुरु आहे ती म्हणजे बाप्पाच्या आगमनाची. दरवर्षी घराघरात येणारा हा पाहुणा यंदा जरा जास्त दणक्यात येणार आहे, त्यामुळं उत्साहानं परमोच्च शिखर गाठलं आहे. असं असतानाच उत्सवाच्या या संपूर्ण वातावरणात सर्वसामान्यांची चिंता काशीही वाढवणारी बातमी समोर आली आहे.
ही बातमी आहे, दूध दरवाढीची. काही दिवसांपूर्वीच (amul mother dairy milk) अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ केल्यानंतर आता पुन्हा एकदा दूध दरवाढीचा निर्णय झाला आहे.
1 सप्टेंबरपासून ही नवी दरवाढ लागू होणार आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसण्याची चिन्हं आहेत. आता मुंबईत सुटं दूध महागणार आहे. त्यामुळे एक लिटर दुधासाठी जवळपास 80 रुपये मोजावे लागणार आहेत. सणासुदीच्या दिवसांमध्ये सर्रास गोडाच्या पदार्थांमध्ये दुधाचा वापर केला जातो. त्यातच झालेली ही दरवाढ मात्र खिशाला फटका देणारी ठरणार आहे. (Dairy milk price hike by 7 rupees)
का वाढले दर?
गुरांच्या चाऱ्याचे दर दुप्पट झाले आहेत. तूर, हरभऱ्याच्या किंमतीही 15 ते 25 टक्क्यांनी वाढल्या आहेत. परिणामी दरवाढीचा निर्णय केल्याचं सांगण्यात येत आहे. ही दरवाढ 1 सप्टेंबरपासून- 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू असेल.