२४ तासानंतर चर्चगेट-डहाणू लोकल पूर्वपदावर

तब्बल २४ तासांच्या खोळंब्यानंतर चर्चगेट ते डहाणू रोड लोकल हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

Updated: Jul 11, 2018, 07:34 PM IST

मुंबई : तब्बल २४ तासांच्या खोळंब्यानंतर चर्चगेट ते डहाणू रोड लोकल हळूहळू पूर्वपदावर येत आहे. चर्चगेट ते भाईंदर लोकलसेवा सुरळीत सुरू झालीय. तर भाईंदर ते विरार लोकल वाहतूक संथ गतीनं सुरू झालीय. मात्र विरारपासून डहाणूपर्यंतची वाहतूकही सुरळीत झालीय. 

सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी चर्चगेटहून वसई रोड स्थानकात आलेली गाडी विरारच्या दिशेनं सोडण्यात आली. सकाळच्या सत्रात विरारहून चर्चगेटच्या दिशेनं पाच लोकल गाड्या रवाना झाल्या होत्या. या गाड्या विरार ते नालासोपारा प्रवासात  ताशी १० किमी वेगानं धावल्या. त्यामुळे आता तीन ट्रॅकवरची वाहतूक सुरू झालीय.