मुंबई: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मनसेच्या ट्विटर हँडलवरून राज ठाकरे आणि बाळासाहेबांचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोत अमित ठाकरे हेदेखील दिसत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची ९४ वी जयंती आहे. यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कवरील येथील स्मृतिस्थळावर दाखल झाले आहेत.
विचारांचा आणि कृतीचा वारसा इतका उत्तुंग आणि यथायोग्य आहे की वर्तमान आणि भविष्याला संघर्षाचं ओझं कधीच वाटू शकत नाही!#बाळासाहेब_ठाकरे_जयंती #मनसेअभिवादन pic.twitter.com/wbMrhYKWCm
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) January 23, 2020
बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जंगी सत्कार सोहळा आयोजित केला आहे. तर आजच मुंबईत मनसेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन पार पडत आहे. काहीवेळापूर्वीच राज ठाकरे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. यावेळी राज ठाकरे यांनी बाळासाहेबांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली. बाळासाहेब आजही जनतेसाठी प्रेरणादायी आहेत. ते अत्यंत कर्तृत्ववान आणि कोणापुढेही न झुकणारे होते. लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी आवाज उठवायला कधीच मागेपुढे पाहिले नाही, असेही मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Tributes to the great Balasaheb Thackeray on his Jayanti. Courageous and indomitable, he never hesitated from raising issues of public welfare. He always remained proud of Indian ethos and values. He continues to inspire millions.
— Narendra Modi (@narendramodi) January 23, 2020