महाराष्ट्रात फक्त तीनच पेहलवान आहेत- रामदास आठवले

रामदास आठवले यांची 'झी २४ तास'ला सर्वप्रथम विशेष मुलाखत 

Updated: Oct 17, 2019, 11:10 AM IST
महाराष्ट्रात फक्त तीनच पेहलवान आहेत- रामदास आठवले  title=

मुंबई : महाराष्ट्रात फक्त तीनच पेहलवान आहेत. देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि आठवले हेच तीन पेहलवान असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे अध्यक्ष रामदास आठवले म्हटले. 'झी २४ तास'ला सर्वप्रथम दिलेल्या विशेष मुलाखत ते बोलत होते. शरद पवार हे कुस्ती संघटनेचे अध्यक्ष होते. पण आता त्यांचे डावपेच चालत नाहीत. आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रामदास आठवले हे तीनच पेहलवान असल्याचे ते म्हणाले. या मुलाखतीत त्यांनी विविध प्रश्नांना स्पष्ट उत्तरे दिली. 

मोदी-शहांशी एवढी जवळीक कशी ? असा प्रश्न यावेळी त्यांना विचारण्यात आला. यावेळी दलितांनी मोदींचे नेतृत्व मान्य केले आहे. ज्यावेळी पंतप्रधानांची आम्ही निवड केली तेव्हा त्यांनी संविधानाला नमन केले असे कारण आठवले यांनी सांगितले. माझे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस अशा सर्वांशी चांगले संबध असल्याचे ते म्हणाले.   

माझ्या पक्षाची ताकद कमी असली तरी त्यांना पाठींबा मिळत आहे. दलित समाजासाठी मी सत्तेमध्ये आहे. दलित नेत्यांना सत्तेत वाटा मिळावा म्हणून मी लढत असल्याचे ते म्हणाले. 

काँग्रेसच्या काळात सर्व स्मारके अशीच पडली होती. पण या सरकारमध्ये इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचे स्मारकही होईल तसेच अनेक स्मारके होत असल्याचे ते म्हणाले.

हे सरकार अजिबात संविधान बदलणार नाहीत. बाबासाहेबांना अपेक्षित असणारा भारत घडवण्याचे काम सुरु असल्याचा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.