'बात “हरामखोरीची”निघाली तर मग "डांबराने" लिहीले जाईल '

आशिष शेलारांच 'सामना'च्या अग्रलेखाला प्रत्युत्तर 

Updated: Sep 9, 2020, 11:20 AM IST
'बात “हरामखोरीची”निघाली तर मग "डांबराने" लिहीले जाईल ' title=

मुंबई : बात “हरामखोरीची”निघाली तर मग "डांबराने" लिहीले जाईल असे मुंबईकरांना बरेच आठवेल!, असं म्हणत भाजप नेता आशिष शेलार यांनी 'सामना' च्या अग्रलेखाला प्रत्युत्तर दिलं आहे. १०६ हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेस सोबतच सत्तेत बसलात ना?  मुंबाई मातेचा अपमान कोण करतेय? असा सवालही ट्विटरच्या माध्यमातून आशिष शेलारांनी यावेळी विचारला.   

आशिष शेलारांनी यावेळी अनेक सवाल विचारले? 

बेईमानी नेमकी कोण करतेय? हुतात्म्यांचे तळतळाट तुम्हाला तर लागणार नाही ना? ऐवढे तपासून पहा! मुंबई साखळी बाँम्ब स्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांना मारणाऱ्या टायगर मेमनच्या माहिमच्या घरात, ऑफिसमध्ये महापालिका बुलडोझर घेऊन घुसवलीत होती का ? पण रस्त्यावरच्या खड्यांवर बोलणाऱ्या रेडिओ जॉकी मलीष्काच्या घरात आणि कंगना रौनातच्या घरात पालिका अधिकारी घुसवलेत ना? या गोष्टीची आठवण करून देत चिमटे काढले आहेत.

भारत तेरे तुकडे हो हजार, असे म्हणणाऱ्या उमर खालिद गँगला मुंबईत येण्यास कधी रोखले नाहीत ना? त्यांच्या कार्यक्रमात सोबत बसायला निघाला होतात ना? गेट वे ऑफ इंडियाला आझाद काश्मीरचा फलक झळकवणाऱ्या देशविरोधी मेहक प्रभूच्या घरात पालिका कधी घुसवली नाहीत ना?

कर्तबगार मुंबई पोलीसांवर, मुंबईकरांवर गोळ्या झाडणाऱ्या कसाबला "बिर्याणी" घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची "बिर्याणी" खाताय ना? याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यालाच मुंबईचा पालकमंत्री केलेत ना? 
बेईमानी, तळतळाट हे तुम्हालातच तर लागत नाहीत ना? “बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी “