मुंबई : Aryan Khan Drugs Case : ड्रग्ज पार्टी प्रकरणी नवनवीन खुलासे होते आहे. Drugs Caseमधील प्रमुख साक्षीदार प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याने आपण केलेल्या आरोपावर ठाम असल्याचे म्हटले आहे. मी सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करत आहे, असे किरण गोसावी (Kiran Gosavi) याच्यावर आरोप करणाऱ्या प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याने म्हटले आहे. हे सगळं मला बदनाम करण्याचा हा डाव आहे, असे त्याने म्हटले आहे.
मी 50 लाख रुपये पॉलिथीन बॅगेतून घेतले. गाडीत टाकले आणि घरी गेलो. 22 जुलैला मी ड्युटी जॉईन केली होती. त्याच्या मित्राच्या अकाउंटवरून पैसे आले. 5000 रूपये आणि नंतर 10,000 आले. दरम्यान, माझे या डिलशी काही घेणं देणं नाही. मला कोणी आमिष दाखवलेले नाही. राहत्या घरी पोलीस वगैरे येत होते. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष मला सोलापूरला घेऊन मुंबईत आले आणि मी सगळे त्यांना सांगितले, अशी माहिती प्रभाकर साईल यांने पत्रकार परिषेदत सांगितली.
माझ्या घरी पोलीस येत आहेत. मी माझ्या मित्राला मदत करण्याची विनंती केली. त्यानंतर मी सोलापुरात गेलो. माझ्याकडे ऑडिओ आहे. फोटो आहेत. माझ्या मित्राने सांगितले की मीडियाच्या माध्यमातून सगळे सांगण्याचा प्रयत्न कर. त्यानंतर मी मीडियाशी बोललो. हे सगळं मला बदनाम करण्याचा हा डाव आहे. मला थोडा वेळ मिळाला की मी सगळे उघड करणार आहे. मी माझ्या वकिलांशी बोलणार आहे. मी सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करत आहे, असे प्रभाकर साईल यावेळी म्हणाला.
दरम्यान, माझे नेत्यांशी संबंध नाहीत. मी एक स्वच्छ चारित्र्याचा नागरिक आहे. माझ्यावर एकही आरोप किंवा गुन्हा नाही आयुष्यात. मात्र, या प्रकरणात मला बदनाम करण्याचा डाव सध्या सुरू झाला आहे, असा आरोप साईल याने केला.
अभिनेता शाहरुख खानच मुलगा आर्यन खान याचे ड्रग्ज प्रकरण दाबण्यासाठी 18 कोटींची डील झाल्याचा धक्कादायक खुलासा करणारा व्हिडीओ समोर आला आहे. के.पी गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने हा व्हिडीओ व्हायरल करून प्रकरण दाबण्यासाठी 18 कोटींची डील झाली होती आणि त्यातले 8 कोटी NCBचे अधिकारी समीर वानखेडे यांना दिले जाणार होते, असा गंभीर आरोप प्रभाकर साईल याने केला आहे. किरण गोसावी याच्या सांगण्यावरून साईलने 50 लाख रुपये कलेक्ट केल्याचा खुलासा केलाय आहे. या 50 लाख रुपयांमधील 38 लाख रुपये सॅम डिसोझा याला दिल्याचा दावा देखील व्हिडिओमध्ये केला आहे.